मुंबई – कंगणाची (kangana) टिवटिव आता बंद झाली असली तरी ती दुस-या सोशल मीडियाच्या माध्यमातून (social media active)अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगणा चर्चेत आली आहे. अरे ला का रे करण्यात कंगणा प्रसिध्द आहे. आपल्या भुमिकेवर ठाम राहून त्यासाठी वाट्टेल तितका विरोध सहन करण्याची ताकदही कंगणा जवळ आहे. गेल्या महिन्यात व्टिटरनं तिचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं. मात्र त्याचा काही एक परिणाम कंगणावर झालेला नाही. आता सरकारनं तिला इन्कम टॅक्सची (income tax notice) नोटीस पाठवलीय त्यावरुन तिनं एक प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood actress Kangana Ranaut Unable To Pay Half Of Last Year Tax Due To no work)

कंगणानं अर्धाच आयकर भरला (income tax) हे. त्यामुळे तिनं त्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनानं सगळ्यांनाच एका मोठ्या आर्थिक संकटात ढकलले आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आर्थिक गोष्टीवरही झाला आहे. मोठमोठे सेलिब्रेटी त्या संकटाचा सामना करताना त्रस्त झाले आहेत. यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याविषयची माहिती दिली होती. कंगणानं देखील आपल्याला यावेळचा आयकर अर्धाच भरावा लागल्याचे सांगितले आहे. त्याचे कारण सध्या आपल्याकडे काही काम नसल्याचे तिनं सांगितले आहे.

kangana status

इंस्टावर कंगणानं लिहिलं आहे की, गेल्या वर्षी मला अर्धाच टॅक्स भरावा लागला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे झाले आहे की मला टॅक्स भरायला उशिर झाला आहे. त्यामुळे सरकारनं माझ्य़ा शिल्लक टॅक्सवर व्याज आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्याचे मला काही वाटत नाही. आताची वेळ भांडत बसण्य़ाची नाही. आपण सर्वांनी एकजुटीनं काम करण्याची गरज आहे. असे मला वाटते.

Also Read: लग्नच नाही, तर घटस्फोट कसला? नुसरतचा खुलासा

Also Read: बाळकडू चित्रपटाची निर्माती स्वप्ना पाटकरला अटक, बनावट डिग्री प्रकरण

मी सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री आहे. असा दावा कंगणान केला आहे. सर्वाधिक टॅक्स देणा-यांच्या यादीत मी येते. मी माझ्या एकुण उत्पन्नांपैकी 45 टक्के रक्कम ही कर म्हणून सरकारला देते. मात्र सध्या कोरोनामुळे परिस्थिती बिकट असल्यानं मला कर भरायला जमले नाही. असेही कंगणानं सांगितलं आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here