पश्चिम बंगालची राजधानी असलेले शहर कोलकता. येथे संपूर्ण संस्कृतीचे दर्शन होते. अनेक साहित्यकार, बुद्धीमान, महान योद्ध्यांसाठी हे शहर ओळखले जाते. अशा अनेक महनीय लोकांचे या शहरासोबत अनोखे नाते आहे. सिटी ऑफ जॉय या नावाने कोलकता शहराची खास ओळख आहे. या ठिकाणी फिरणे आणि पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ही ठिकाणे कोलकता शहरापासून जवळ असल्याने हॉलिडे डेस्टिनेशन्ससाठी किंवा विकेंडसाठी तुम्ही इथे पर्यटनाचा प्लॅन करु शकता.

सुंदरबन

हे एक मोठे जंगल आहे. या जंगलात बंगाली वाघ नैसर्गिक आधिवासात सर्रास फिरताना दिसतात. विविध पक्षी त्यांच्या जाती पहायला मिळतात. युनेस्को अंतर्गत १९९७ ला या जंगलाला विश्व धरोहर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.

बिश्नुपुर

८ व्या शतकात बिश्नुपुर हे हिंदू मल्लाभूम राज्याची राजधानी होती. या नगराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. जी बिश्नुपुर श्रीकृष्णाच्या रासलीला आणि बालूचरी पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

शांतिनिकेतन

बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतन हे एक छोटासे शहर आहे. जे महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केले होते. पुढे त्यांचे पुत्र रविंद्रनाथ टोगोर यांनी त्याचा विस्तार केला. आता याला विश्वभारती विद्यालय या नावाने ओळखले जाते.

हेनरी आयलॅंड

२४ परगनामध्ये असलेला बक्खली येथे हा लहानसा द्वीप आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात सापडणारी झुडपे येथे पहायला मिळतात. पांढऱ्या मातीसोबतचा समुद्री तट आणि मैंग्रोव जंगल असा अनोखा शांत द्वीप म्हणून याकडे पाहिले जाते.

बक्खाली

शांतता हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. ८ किमीपर्यंत पसरलेला किनारी भाग बंगालातील सर्वात शांत समु्द्रीप्रदेश म्हणून ओळखला जातो.

ताजपुर

देशातील प्रसिद्द समुद्र तटांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते. जर साहसी खेळ किंवा तशी मजा घ्यायची असल्यास तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. या प्रदेशात स्पोर्ट्स आणि पैरालॅंडिंग एंजॉय करु शकता.

शंकरपुर

शंकरपुर समुद्र हा दिघा समुद्र सपाटीपासून थोड्याच अंतरावर आहे. कोलकता शहराप्रमाणे धगधग आणि गर्दी यापासून शांततेत हे ठिकाण आहे. येथे गेल्यानंतर मनला आनंद आणि समाधान मिळते.

मायापुर

नवद्वीप मधील एक द्वीप म्हणजे मायापुर. काही प्रसिद्ध असणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी हे एक आहे. याच्या एका बाजूला हुगली नदी तर दुसऱ्या बाजूला जलंगी नदी वाहते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here