वर्णभेदी टिप्पणीमुळे इंग्लिश क्रिकेटर रॉबिन्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द पहिल्याच सामन्यात दी एन्डच्या मोडवर आली. जुन्या ट्विटच्या प्रकरणात ईसीबीने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. या प्रकरणानंतर वर्णभेदी घटनांवरुन क्रिकेट जगतात एकच खळबळ माजली आहे. त्याच्याशिवाय अन्य काही इंग्लिश दिग्गज क्रिकेटर अडचणीत येण्याची शक्यता दिसत असताना भारताचे माजी क्रिकेटर आणि विकेटकिपर फलंदाज एका बाजूला केलेल्या नस्लीय टिप्पणी के फारुख इंजिनियर यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. फारूख इंजीनियर यांनी इंग्लंड पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रॉबिन्सनची पाठराखण केल्याच्या मुद्याचा समाचार घेतलाय. ज्या खेळाडूने आक्षेपार्ह कृती केली ती व्यक्त शिक्षेस पात्र असून अशा प्रकरणात पंतप्रधानांनी प्रतिक्रिया देणे योग्य वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. (farokh engineer on ollie robinson tweets punishment england cricket)

फारुख इंजिनियर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेय की, ओली रॉबिन्सन प्रकरणात पंतप्रधानांनी हस्तक्षेप करणे चुकीचे वाटते. अशा प्रकरणाची कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेता कामा नये. ईसीबीने खेळाडूला निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय त्याचे समर्थन करत चुकीच्या कृत्याला शिक्षा व्हायलाच हवी, असे मत फारुख इंजिनियर यांनी व्यक्त केले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी केलेली कारवाई इतर खेळाडूंसाठी धडा असेल, असेही ते म्हणाले.

Also Read: ऑलिम्पिकसाठी भारत प्रबळ दावेदार; गुजरातने कसली कंबर

भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या आणि सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या फारुख इंजिनियर यांनी आपल्या काळातील वर्णभेदाच्या घटनांवरही भाष्य केले. काउंटी क्रिकेट खेळताना भारतीय असल्यामुळे वर्णभेदाचा सामना करावा लागला. लोक माझ्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघायचे. लँकेशायरकडून खेळताना वर्णभेदाचा सामना करावा लागला. भारतातून आल्याने मला वेगळी वागणूक मिळायची. इंग्लंड क्रिकेटर्सच्या तुलनेत इंग्लिश चांगले असल्यामुळे मी त्यांना जशास तसे उत्तर द्यायचो, असा किस्साही त्यांनी शेअर केलाय.

Also Read: French Open : सेमीफायनलमध्ये नदाल-जोकोव्हिच यांच्यात फाईट?

भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्णभेदाचा सामना करावा लागतो. इंग्लंडचे माजी कर्णधार जॉयफ्री बयकॉट यांनी कॉमेंट्री करताना ‘ब्लडी इंडियंन्स’ असा उल्लेख केल्याचा दाखलाही यावेळी त्यांनी दिला. आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल झालाय. कोणत्याही इंग्लंड खेळाडूला आता आपल्याविरोधात बोलण्याचे धाडस करु शकत नाही, असेही ते म्हणाले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here