कोल्हापूर: साडी (sari)ही एक अशी आऊटफिट आहे तिच्यासोबत खूप सारे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता.मात्र हे एक्सपेरिमेंट असे हवेत ज्यामध्ये तुमचा लूक सुद्धा खूप सुंदर दिसेल. आज-काल स्टाईल करण्यासाठी बेल्ट केप, कोट अशा वस्तूंचा वापर केला जातो. जो साडीच्या संपूर्ण लुकलाच बदलून टाकतो. आणि सिम्पल दिसणारी साडी डिझायनर (Designer sari)दिसू लागते.(sari-scarf-drape-stylish-look-tips-marathi-news)

बॉलिवूड एक्ट्रेसेसमध्ये आज काल दुपट्टा ऑन साड़ी लुक खूप चर्चिला जात आहे. अशा प्रकारच्या साडी लुकसाठी सिम्पल दिसणारी साडी डिझाईन बनवण्यासाठी त्याच्यावर मॅच करेल असा दुपट्टा कल्‍ब करू शकता. चला तर आज जाणून घेऊया..

डबल पल्लू साडी

डबल लुक साडी मध्ये विद्या बालन नी ब्लॅक साडी सोबत मॅच करेल असा ब्लॅक कलरचा डिझायनर दुपट्टा कॅरी केला आहे. जर तुम्हाला असा लुक्स पसंत असेल तर यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

-सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बेसिक साडी ड्रेपिंग करून घ्या आणि पदराला ओपन फॉल स्टाईल मध्ये केले करा.

-यानंतर साडीला मॅच करेल असा डिझायनर दुपट्टा घ्या. त्याच्या एका कोपऱ्याला साडीच्या साईटला टकइन करून घ्या.

-त्यानंतर शिल्लक राहिलेल्या दुप्पट्याला दुसरा हातामध्ये घेऊन कॅरी करू शकता.

साडीच्यावर दुपट्टा

जर तुम्हाला फॅन्सी प्रिंट असलेली साडी घालायची असेल आणि सुंदर दिसायचे असेल तर त्यावरती दुपट्टा कॅरी करू शकता.सोनम कपूर सारखे रेक्रियेट करायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.

-सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बेसिक साडी ड्रेपिंग करून घ्या. आणि पदराला ओपन फॉल स्टाईल मध्ये कॅरी करा.

-साडी प्रिंटेड असेल तर दुपट्टा ही सॉलिड कलर सारखाच असायला हवा. मात्र दुपट्टा साडीच्या रंगावर मॅच करणारा असाच असावा.

-दुपट्टा मध्ये पातळ प्लेट्स तयार करा.आणि साडी मध्ये टकइन करून द्या.हे करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की दुप्पटा प्लेट्स आणि साडीच्या लोअर प्लेट्स या दोन्ही मध्ये अंतर ठेवलेले असावे.

-आता दुप्पट त्याला दुसऱ्या शोल्डर वर टाका आणि गळ्या मधून लपेटून घ्या.

टीप-या साडीच्या लूकसाठी त्याच फॅब्रिकचा दुपट्टा खरेदी करा. जसे की साडीचा लुक जॉर्जेट, शिफॉन असेल तर दुप्पटाही तसाच असावा.

मफलर स्टाईल साडीवर दुपट्टा

मफलर स्टाईल दुपट्टा असलेल्या साडीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांना आपण अनेकवेळा पाहिले आहे. रेखा खासकरून कांजीवरम, सिल्क साडी घालणे पसंद करतात.मात्र साडी सोबत एक्सपिरिमेंट करायची वेळ येते तेव्हा रेखा कधी मागे हटत नाही.जर तुम्हाला रेखा सारखे लुक करायचे असेल तर खालील स्टेप्स फॉलो करा.

-साडी ड्रेस करा आणि ओपन स्टाईल पदर घ्या.

-जर तुमच्या साडीमध्ये कुठलेच प्रिंट नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे की, तुम्ही बिना प्रिंटरवाला दुपट्टा घ्या.

-आता या दुपट्टाला गळ्या मधून मफलर स्टाईल मध्ये घ्या.

टीप-या लुकसाठी रेखा सारखं ऑर्गेंजा साड़ी निवडा आणि सेम फॅब्रिक आणि कलर चा दुपट्टा कॅरी करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here