नंदुरबार : जिल्ह्यातील १९ लाख ८७ हजार ८७५ लोकांना कोरोना (corona) लसीकरणाचे (vaccination) उद्दीष्ट होते. त्यापैकी २ लाख ५१ हजार २६६ नागरिकांनी (citizens) (१७.२३ टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ५० हजार ९४६ नागरिकांनी (३.४९) दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात कोरोना लसीचे तीन लाख डोस देण्यात आले आहेत.
(nandurbar district three lakh citizens corona vaccination)
नंदुरबार तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ५ हजार ७९७ व्यक्तींनी पहिला डोस तर ७७९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ५४ हजार ४९८ व्यक्तींनी पहिला तर १० हजार ९४१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ३ हजार ४४६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि त्यापैकी २ हजार ४०२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ८ हजार ८३३ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर २ हजार ५६८ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ८९ हजार ३६४ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतले आहे.

नवापूर ः १८ ते ४४ वयोगटातील २ हजार ६४३ व्यक्तींनी पहिला डोस तर ८४ व्यक्तींनी
दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील ३६ हजार २८३ व्यक्तींनी पहिला तर ४ हजार २१५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. २ हजार ३४७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी १ हजार ३१८ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ८ हजार ८६५ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर १ हजार ५७२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ५७ हजार ३२७ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतले आहे.
शहादा ः १८ ते ४४ वयोगटातील २ हजार ५०९ व्यक्तींनी पहिला तर २५१
व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील ५४ हजार ९३५ व्यक्तींनी पहिला तर ११ हजार ५१३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ३ हजार ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी १ हजार ९९४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ६ हजार ८९० कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर २ हजार ३१२ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ८३ हजार ८०४ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतले आहे.
तळोदा ः १८ ते ४४ वयोगटातील २ हजार २४ व्यक्तींनी पहिला डोस तर ६१ व्यक्तींनी
दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील १९ हजार १७२ व्यक्तींनी पहिला तर ४ हजार २०९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. १ हजार ७७३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी ६४४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. २ हजार ६८६ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर १ हजार ४४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ३१ हजार ६१३ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतले आहे.

अक्कलकुवा ः १८ ते ४४ वयोगटातील ७७६ व्यक्तींनी पहिला डोस तर २८० व्यक्तींनी दुसरा
डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील १४ हजार ५९ व्यक्तींनी पहिला तर १ हजार २ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. १ हजार ८९३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी १ हजार १७ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला ५ हजार २२२ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर १ हजार ४५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण २५ हजार २९४ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतले आहे.

धडगाव ः १८ ते ४४ वयोगटातील ५४० व्यक्तींनी पहिला डोस तर ३० व्यक्तींनी दुसरा डोस
घेतला आहे. तर ४५ वर्षावरील ७ हजार ४८९ व्यक्तींनी पहिला तर ४२७ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. २ हजार २०८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला त्यापैकी ८०५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. २ हजार ८७८ कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी पहिला तर ४३३ कर्मचाऱ्यांनी
Esakal