रावेर : तालुक्यात खरीप हंगाम पेरणीसाठी शेतकरी (Farmer) वर्ग सज्ज झाला असून, पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहे . सुमारे नऊ हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात बागायती कपाशीची (cotton) पेरणी पूर्ण झाली आहे. तर, केळी (Banana) लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची कोळपणी सुरु केली आहे. (cotton banana cultivation in the final stage)
Also Read: अचानक शेतात वीज पडली..दैव बलवत्तर आणि 10 जणांचा जीव वाचला
रावेर तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी कृषी विभागाने उद्दिष्ट दिले आहेत. यात पेरणीलायक ५२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट दिलेले आहेत. यात बागायती कापूस १५ हजार ६००, जिरायत कापूस ३ हजार ६१०, ज्वारी ५ हजार ३१०, मका २ हजार ३१०, तूर एक हजार ४१५, मूग ३५०, उडीद ८३०, सोयाबीन ४५१, भुईमूग ६०, केळी २१ हजार १३९ इतर ३ हजार ३५९ असे एकूण ५२ हजार ५०४ हेक्टर क्षेत्राचे खरीप पिकासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे.

कपाशीची उगवण चांगली…
दरम्यान, तालुक्यात बागायती कापसासाठी १५ हजार ६०० हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. शासनाकडून २५ मेनंतर बीटी कापसाचे बियाणे उपलब्ध झाले. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मध्य प्रदेशातून बियाणे आणून कपाशीचे बियाणे आणले. आतापर्यंत नऊ हजार हेक्टरहून अधिक हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड झाली आहे. कपाशीची उगवणही चांगली झाली आहे. तालुक्यात सध्या ढगाळ व पावसाचे वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोळपणी करणे सुरु केले आहे. या वर्षी कापसाची पेरणी घटणार आहे. तर, मका पिकात वाढ अपेक्षीत आहे. तालुक्यात केळीची वर्षभरात दोन टप्यात २१ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड होते. मृग बहार केळीची लागवड सध्या तालुक्यात होत असून, ती अंतिम टप्यात आली आहे.
Esakal