जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा (corona) संसर्ग आटोक्यात येत असताना, सर्वाधिक रुग्ण असलेल्या जळगाव शहरातील सक्रिय रुग्ण (patient) दोनशेच्या टप्प्यात आहेत. मात्र, चाळीसगाव तालुक्यात पाचशेवर सक्रिय रुग्ण (Positive patient) आहेत. बुधवारी (ता. ९) दिवसभरात जिल्ह्यात नवे १०९ रुग्ण आढळून आले, तर एका मृत्यूसह (Death) २६१ रुग्ण बरेही झाले.
( corona chalisgaon tops in active patients)
Also Read: वरखेडेत पुन्हा बिबट्याचे दर्शन..आणि शेतकऱ्यांची उडाली झोप !
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग मे महिन्यात बऱ्यापैकी नियंत्रणात आला. संपूर्ण महिन्यात साडेचार हजारांवर सक्रिय रुग्ण घटले. जून महिन्यातही नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचा ट्रेंड कायम आहे. बुधवारी सहा हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी १०९ नवे रुग्ण समोर आले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार २०९ झाली आहे, तर २६१ रुग्ण बरे झाले असून, बरे होणाऱ्यांची संख्या एक लाख ३६ हजार १९० वर पोचली आहे. गेल्या २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला.

सर्वांत कमी रुग्ण भडगावात
जिल्ह्यात संसर्ग वाढत असताना, जळगाव शहरात त्याची तीव्रता अधिक होती. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येसह सक्रिय रुग्णांत जळगाव टॉपवर होते. मात्र, गेल्या काही दिवसांत चाळीसगाव तालुक्यात सातत्याने जास्त रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या चाळीसगाव तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक ५४५ सक्रिय रुग्ण आहेत. सर्वांत कमी ४१ सक्रिय रुग्ण भडगाव तालुक्यात आहेत.
Also Read: अचानक शेतात वीज पडली..दैव बलवत्तर आणि 10 जणांचा जीव वाचला
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर २६, एरंडोल ११, चाळीसगाव १६, जळगाव ग्रामीण पाच, भुसावळ सात, चोपडा आठ, पाचोरा पाच, यावल चार, जामनेर आठ, रावेर पाच, पारोळा पाच, मुक्ताईनगर तीन, बोदवड दोन. अमळनेर व धरणगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.
Esakal