महिला एकेरीत फ्रेंच ओपनची सम्राज्ञी इगा श्वीऑनटेक हिला पराभवाचा धक्का देत ग्रीसच्या मारिया सक्कारीने सेमीफायनल गाठली.दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझिकोव्हा हिने 17 वर्षीय अमेरिकन कोको गॉफ हिला पराभूत करत सेमीफायलचे तिकीट मिळवले. फ्रेंच ओपन स्पर्धेत मोजक्या प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी एन्ट्री देण्यात आली आहे.सामन्याचा आनंद घेत फोटोग्राफी करताना चाहत्यांमध्ये दिसलेला उत्साह काही औरच होता.25 वर्षीय बार्बोराने दोन तास 50 मिनिटाच्या रंगतदार सामन्यात कोका गॉफला नमवले. सामना जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना बार्बोरा क्रेझिकोव्हा चेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेझिकोव्हा सेमीफायनलमध्ये ग्रीसच्या मारिया सक्कारी विरोधात कोर्टवर उतरेल.