मुंबई – बॉलीवूड सेलिब्रेटींची (bollywood celebrities kid) मुलं ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. त्यांच्याबद्दल त्या सेलिब्रेटींच्या चाहत्यांना कुतूहल असते. बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यपची (daughter of anurag kashyap) मुलगी सध्या चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या नावानं फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिनं तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे की त्या अकाउंटकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. अनुरागच्या मुलीच नाव आलिया (aaliyah) असं आहे. (Anurag Kashyap Daughter Aaliyah Kashyap Calls Out Fake Profile On A Dating app)
सोशल मीडियावर आलिया कश्यप (social media) नेहमी चर्चेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करुन ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपासून आलिया तिच्या लव लाईफबद्दल देखील चर्चेत असते. ती एक युट्युब चॅनेलही चालवते. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. सध्या आलियानं सोशल मीडियावर एक मेसेज केला आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, माझ्या नावानं एकानं फेक डेटिंग अॅप (dating app) तयार केले आहे. त्यामुळे तिचा राग अनावर झाला आहे.

आलियानं तिच्या इंस्टावरुन ही माहिती दिलीयं. तिनं त्या फेक डेटिंग अॅपचा स्क्रिन शॉटही शेअर केला आहे. याबरोबर आपल्या फॅन्सला सांगितले आहे की, आपली आयडी कुणाला जर दिसली तर त्याला तातडीनं ब्लॉक करा. आणि त्याचा रिपोर्ट करा. याशिवाय तिनं फॅन्सला अशा प्रकारच्या हॅकिंग पासून सावध राहण्याचा सल्ला दिलायं.
Also Read: ‘भावा, तुझं करिअर कोणी उद्धवस्त करु शकणार नाही’
Also Read: सनी गरजूंच्या मदतीला, सोशल मीडियावर होतंय कौतुक
आलिया कश्यपच्या नावानं ‘OkCupid’ नावानं डेटिंग अॅपवर प्रोफाईल आहे. तिनं त्याचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. त्या पोस्टखाली तिनं कॅप्शनही दिली आहे. त्यात तिनं फेक प्रोफाईल्स असे लिहिले आहे. हे प्रोफाईल माझे नाही. त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. आणि अशाप्रकारच्या फेक प्रोफाईलपासून सावध राहा. असं तिनं फॅन्सला सांगितलं आहे.
Esakal