सातारा : हद्दवाढीनंतर होऊ घातलेल्‍या निवडणुकीत (Election) सातारा विकास आघाडीचे (Satara Vikas Aghadi) पालिकेत वर्चस्‍व कायम राखण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी हालचाली सुरू केल्‍या असून, आज त्‍यांनी आघाडीच्‍या सर्व नगरसेवकांनी गेल्‍या साडेचार वर्षांत केलेल्‍या कामांचा आढावा घेत यापुढील काळात करावयाच्‍या कामांचे प्रस्‍ताव सादर करायच्‍या सूचना केल्‍या. बैठकीदरम्‍यान त्‍यांनी नगरसेवकांचे कान उपटत भांडणे ला‍वणाऱ्या अधिकाऱ्यां‍वर कारवाईच्‍या सूचना केल्‍या. (Review Meeting Of MP Udayanraje Bhosale Regarding The Working Of The Satara Municipality At Jalmandir Palace)

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता असून, त्‍या माध्‍यमातून खासदार उदयनराजेंनी साताऱ्यावरील पकड घट्ट ठेवली आहे.

सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची सत्ता असून, त्‍या माध्‍यमातून खासदार उदयनराजेंनी साताऱ्यावरील पकड घट्ट ठेवली आहे. हद्दवाढीमुळे शाहूपुरी, विलासपूर, दरे बुद्रुक, शाहूनगरसह खेड ग्रामपंचायतीचा काही भाग सातारा पालिकेत आला आहे. नवीन भाग पालिकेत आल्‍याने सभागृहातील नगरसेवकांची संख्‍या सत्तेचाळीसच्‍या घरात पोचणार आहे. वाढीव भागासह साताऱ्यावर सातारा विकास आघाडीचे वर्चस्‍व कायम राखण्‍यासाठी उदयनराजे सातारा विकास आघाडीच्‍या माध्‍यमातून सक्रिय झाले आहेत. लॉकडाउनमुळे (Lockdown) पालिकेच्‍या प्रशासकीय कामकाजावर मर्यादा आल्‍या असून, त्‍या जाणून घेत विकासकामे मार्गी लावण्‍यासाठी उदयनराजेंनी बैठकांचा धडाका लावला आहे. याच अनुषंगाने त्‍यांनी आज जलमंदिर येथे सातारा विकास आघाडीच्‍या नगरसेवकांची बैठक घेतली.

Also Read: Krishna Factory Election : सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा हेतू उघड

मुख्‍याधिकारी अभिजित बापट, नगराध्‍यक्षा माधवी कदम, उपाध्‍यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद निशांत पाटील यांच्‍यासह नगरसेवकांकडून उदयनराजेंनी गेल्‍या साडेचार वर्षांतील कामांचा आढावा घेतला. आढाव्‍यादरम्‍यान अनेक नगरसेवकांनी केलेल्‍या कामांची माहिती देत आगामी काळात कोणती कामे हाती घ्‍यावी लागतील, याची माहिती त्‍यांना दिली. याचवेळी त्‍यांनी निधीअभावी कामे रखडल्‍याची तक्रारही केली. यावर बापट यांनी कोरोनामुळे उत्‍पन्न घटले असून, त्‍याचा कामांवर परिणाम झाल्‍याचे स्‍पष्‍ट केले. यावर उदयनराजेंनी उपलब्‍ध निधीचा योग्‍य वापर करत सर्वच प्रभागांतील कामे मार्गी लावण्‍याच्‍या सूचना केल्‍या. कामांदरम्‍यान कोणताही दुजाभाव न करण्‍याचे, दुजाभाव केल्‍यास तो खपवून घेणार नसल्‍याची तंबी नगरसेवकांसह प्रशासनास दिली.

Also Read: कोरोना तपासणी नाकारल्यास कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश

Udayanraje

बैठकीत काही जणांनी पालिकेचे अभियंते भांडणे लावत असल्‍याची तक्रारही झाली. याची दखल घेत त्‍या अभियंत्‍यास समज देण्‍याची सूचनाही बापट यांना केली. याचदरम्‍यान एका कामाच्‍या टेंडरवरून दोन नगरसेवकांच्‍या तू तू मै मै झाली. यावरून उदयनराजेंनी दोन्‍ही नगरसेवकांचे कान उपटत त्‍यांना आपल्‍या स्‍टाइलने समज दिली. बैठकीतील मुद्दे नोंदवत उदयनराजेंनी प्रत्‍येकास प्रस्‍तावित कामांचा आराखडा सादर करण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच बैठकीत नगराध्‍यक्षा कदम यांनादेखील गत साडेचार वर्षांत खर्च केलेल्‍या नगराध्‍यक्ष फंडाची माहिती देण्‍यास सांगत उदयनराजेंनी गटतट बाजूला ठेवत आघाडीने केलेली विकासकामे जनतेसमोर नेण्‍याच्‍या सूचना नगरसेवकांना केल्‍या.

Also Read: कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणं ही जिल्हावासियांची जबाबदारी : शेखर सिंह

चार नगरसेवक अनुपस्‍थित

उदयनराजेंनी पालिकेच्‍या कामकाजाचा आढावा घेण्‍यासाठी जलमंदिर येथे बैठक बोलावली होती. या बैठकीस सातारा विकास आघाडीचे चार नगरसेवक अनुपस्‍थित होते. हे नगरसेवक बैठकीस का अनुपस्‍थित होते, याची माहिती सातारा विकास आघाडीच्‍या कोणत्‍याही जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मिळाली नाही.

Review Meeting Of MP Udayanraje Bhosale Regarding The Working Of The Satara Municipality At Jalmandir Palace

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here