• इमारत अनाधिकृत होती पण दुर्घटना टाळता आली असती

मुंबई: शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai heavy rainfall) मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. (residential structure collapsed) या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले. जी इमारत कोसळली, त्याच्या आसपासच्या तीन इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. कारण आसपासच्या इमारतीदेखील जुन्या (old building) आणि जर्जर अवस्थेत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या दुर्घटनेचा आढावा घेतला आणि महत्त्वाची माहिती दिली. (Mumbai Malad Building Collapse Police Vishwas Nangare Patil gives important updates)

Also Read: मालाडमध्ये तीन मजली इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळली, ११ ठार

नांगरे पाटील म्हणाले, “ही दुर्दैवी घटना आहे. या इमारतीला तौक्ते वादळाच्या वेळीच तडा गेलेला होता. काही स्ट्रक्चरल गोष्टी केल्याने ही बिल्डिंग कोसळली. सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ९ जणांचा आणि ज्या इमारतीवर ही बिल्डिंग कोसळली त्या इमारतीतील दोघांचा मृत्यू झाला. ७ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे.”

Also Read: पावसाची उसंत; लोकल सेवा सुरळीत, रेल्वे प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

“जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून आम्ही या घटनेबद्दलची माहिती घेत आहोत. जी इमारत कोसळली ते बांधकाम अनाधिकृत होतं. त्या बांधकामात काही स्ट्रक्चरल डीफॉल्ट्स (बांधकामातील त्रुटी) होत्या. तोक्तेचा तडाखा हा इमारतीला जेव्हा बसला तेव्हाच याची देखभाल दुरूस्ती केली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती”, अशी माहिती त्यांनी दिली.

Also Read: महापौर मॅडम, आम्ही आमचं काम चोख करतो; ‘रेल्वे’चं सडेतोड उत्तर

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here