पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारी देखील हळू हळू कमी होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 24 जणांचा मृत्यू झाले असून त्यापैकी पुणे महापालिका हद्दीत नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर पिंपरीमध्ये एकही मृत्यू झाला नाही. दरम्यान, पुणे जिल्ह्यात बुधवारी एकूण 1332 नवे कोरोना रुग्ण आढळले त्यापैकी पुणे शहर -311, पिंपरी चिंचवड – 314, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र – 618, नगरपालिका क्षेत्र-74, कॅंटोन्मेंट बोर्ड – 15 इतके रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2057 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

Corona free

नव्याने १५ मृत्यूंची नोंद !

पुणे महापालिका हद्दीत नव्याने15 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 437 इतकी झाली आहे.

गंभीर कोरोनाबाधितांची संख्या 563 !

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 3 हजार 539 रुग्णांपैकी 563 रुग्ण गंभीर तर 1049रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

दिवसभरात 6 हजार 758 टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 758 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 55 हजार 583 इतकी झाली आहे.

दिवसभरात ४५६ रुग्णांना डिस्चार्ज !

शहरातील 456 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 31हजार 063 झाली आहे.

दिवसभरात नवे ३११ कोरोनाबाधित!

पुणे शहरात आज नव्याने 311कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 73 हजार 039 इतकी झाली आहे.

पुणे कोरोना अपडेट : बुधवार 9 जून 2021

उपचार सुरु : 3539

नवे रुग्ण : 311 (473039)

डिस्चार्ज : 456(461063)

चाचण्या :6758 (2555583)

मृत्यू : 15(8437)



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here