कोरोना विषाणूची (coronavirus) लागण झाल्याची अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्यामुळेच सध्या हॉस्पिटल, कोविड सेंटर येथील रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. मात्र, या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येत आहे. विशेष म्हणजे रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेतलेले अनेक डॉक्टर्स आणि इतरेतर कर्मचारी गेल्या वर्षभरापासून सातत्याने कोविडग्रस्तांची सेवा करत आहेत. म्हणूनच, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हॉंगकॉंगमध्ये एक रोबोट नर्स तयार करण्यात आली आहे. ही रोबोट नर्स खऱ्याखुऱ्या परिचारिकेप्रमाणेच प्रत्येक रुग्णाची काळजी घेत आहे. (coronavirus-a-robot-named-grace-will-act-like-a-hospital-nurse)
हाँगकाँगमधील हॅन्सन या कंपनीने एक रोबोट तयार केला असून ग्रेस (grace) असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. हा रोबोट आयसोलेट असलेल्या रुग्णांची सेवा करत आहे. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या कोरोनाच्या संसर्गाची भीतीदेखील निश्चितपणे कमी होईल.
Also Read: टॉयलेटमध्ये मोबाईल नेताय? गुप्तांगाला होऊ शकतो ‘हा’ त्रास
बायो रिडिंग आणि टॉक थेरपीदेखील करतो ग्रेस
हॅन्सन कंपनीने रोबोटिक वर्कशॉपमध्ये ग्रेसच्या बोलण्याची चाचणी केली. त्यानुसार, ग्रेस लोकांसोबत चालू शकतो. त्यांच्यासोबत संवाद साधू शकतो. तो बायो रीडिंग, टॉक थेरपी आणि अन्य वैद्यकीय उपचारांमध्येही मदत करु शकतो.
हुबेहूब मानवाप्रमाणे बोलतो ग्रेस
ग्रेसचं वर्तन अगदी मानवाप्रमाणे असून तो व्यक्तीच्या चेहऱ्यावरील ४८ भाव सहज समजू शकतो. लोकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तो संवाद साधतो.

ग्रेस आहे प्रचंड महाग
एखाद्या नवीन लक्झरी गाडीच्या किंमती इतकीच ग्रेसची किंमत आहे. मात्र, ही किंमत कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येतं. “ग्रेसचा उद्देश आरोग्यविषयक जनजागृती करणं आहे. त्यामुळे सध्या आम्ही त्याला बीटा म्हणजेच सुरुवातीच्या वर्जनवर काम करत आहोत. सध्या तरी ग्रेसला चीनसोबत जपान आणि कोरियाच्या हेल्थ सेंटरमध्ये ठेवण्याचा विचार आहे”, असं हॅन्सन रोबोटिक्स आणि सिंगुलॅरिटी स्टुडिओच्या डेव्हिड लेक यांनी सांगितलं.
Esakal