कोरोना महामारी किंवा लॉकडाउनचं कारण असो, अनेक कलाकार आता साध्या लग्नसमारंभालाच पसंती देत आहेत. मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीपासून बॉलिवूडच्या यामीपर्यंत कोणत्या अभिनेत्रींचं लग्न साध्या पद्धतीने पार पडलं, ते पाहुयात..

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले. यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामीच्या हिमाचल प्रदेश मधील मंडी या भागातील फार्म हाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. झेंडुची फुलं आणि केळीच्या पानांनी लग्नमंडप सजवण्यात आला होता. लग्नानंतर संध्याकाळी छोट्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. तर फार्महाऊसच्या अंगणातच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.
हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री दिया मिर्झा 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखी सोबत लग्नबंधनात अडकली. वैभव बिझनेसमन आहे. दिया आणि वैभवच्या लग्नात महिला पुजारी होती. यामुळे विवाह सोहळा चर्चेत होता. दियाच्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. दियाच्या लग्न सोहळ्यात कन्यादान आणि वधूची पाठवणी हे लग्न विधी झाले नाहीत. तसेच या लग्नातील सजावट देखील पर्यावरणपूरक (इको फ्रेंण्डली) होती.
‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात ‘लारा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्मा नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. एवलिनने डॉक्टर तुशान भिंडी याच्याशी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन इथं लग्न केलं. १५ मे रोजी तिचा विवाहसोहळा पार पडला असून सोशल मीडियावर तिने लग्नाचे फोटो पोस्ट केले होते.
अभिनेत्री नेहा धुपियाने 2018 साली अंगद बेदीसोबत लग्नगाठ बंधली. नेहा आणि अंगदने एका गुरूद्वारामध्ये लग्न केले. या लग्नसोहळ्याला फक्त त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली.सोनाली आणि कुणाल जून किंवा जुलै महिन्यात लग्न करणार होते. मात्र लॉकडाउन आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांचा प्लॅन बदलला. सोनालीने लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहीले होते की, ‘आपल्या देशात अशी परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही. तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here