नागपूर : शहरात मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना (coronavirus) चांगलाच पसरला होता. रोज सात हजारांच्यावर कोरोनाबाधित तर शंभर ते सव्वाशेच्या जवळपास मृत्यू होत होतो. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली होती. एकंदरीत स्थिती पाहता कोरोना हाताबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. लॉकडाउन असताना शहरात ही स्थिती होती. यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली होती. मात्र, मे महिन्याच्या शेवट शेवट परिस्थिती आटोक्यात आली. यामुळे राज्य सरकारने पूर्णतः लॉकडाउन (unlock) काढले. कित्येक महिन्यांनी अनलॉक झाल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. ते खरेदीसाठी, मौजमजा करण्यासाठी बाजारात गर्दी करीत असल्याचे दिसत (The crowd of citizens) आहे. याचा प्रत्यय सीताबर्डीत नागरिकांनी केलेल्या गर्दीवरून दिसून येईल. (crowded-for-shopping-in-Sitabuldi-market-at-Nagpur)
Esakal