सध्याच्या काळात स्मार्ट दिसण्यासोबतच प्रेझेंटेबल असणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया ऑफिसला जातांना हलकासा मेकअप करतात. आता मेकअप केला तर ओघाने परफ्युम लावणं आलं. अनेक स्त्रियांना किंवा पुरुषांना परफ्युमची विशेष आवड असते. त्यामुळे त्यांना योग्य परफ्युमची निवड लगेच करता येतं. परंतु, तुम्ही पहिल्यांदाच परफ्युम खरेदी करत असला तर नेमकी परफ्युमची निवड कशी करावी ते जाणून घेऊयात.
जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर प्रवासादरम्यान कोलोंजचा परफ्युम वापरणं कधीही फायदेशीर ठरेल. या परफ्युमच्या वासामुळे प्रवासातील थकवा, ताण कमी होण्यास मदत मिळते. यात खासकरुन लव्हेंडर किंवा स्टिरस फ्लेव्हरच्या परफ्युमची निवड करावी.
घर, ऑफिस अशी दररोज धावपळ करावी लागत असेल तर ओरिएंटल परफ्युमची निवड करा. या परफ्युमच्या वासामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.
कधीही डार्क परफ्युमची निवड करु नका. परफ्युम कायम सौम्य आणि मंद सुवास येणाराच असावा.
परफ्युमची निवड करतांना त्याचा ब्रॅण्ड आणि क्वालिटी चेक करा. अनेकदा काही परफ्युम लावल्यावर त्वचेची जळजळ होते.
तुमचा स्वभाव चंचल आणि मस्तीखोर असेल तर तुम्ही फ्लोरल आणि फ्रुटी सुगंधाची निवड करा. कारण, दिवसभर धावपळ, मस्ती केल्यामुळे थकवा येऊन घाम येऊ शकतो. अशा वेळी फ्लोरल किंवा फ्रुटी फ्लेवर या दुर्गंधीवर नक्कीच मात करु शकतो.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here