सिंधुदूर्ग : हा तर मुका मुख्यमंत्री आहे. देवाला वेळ देवू शकत नसेल तर लोकांना काय देणार अशी टिका खासदार नारायण राणे यांनी आंगणेवाडी येथे केली.
हेही वाचा- ब्रेकिंग – मुख्यमंत्र्यांसमोरच संतापले भास्कर जाधव ; खासदारांचा झटकला हात –
ग्रामस्थांनी केली नाराजी व्यक्त
भराडी मातेच्या दर्शनास आलेले मुख्यमंत्री ठाकरे हे काहीही भाष्य न करता निघून गेल्याने आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने नाराजी व्यक्त केली. ही बाब खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. ‘ हा तर मुका मुख्यमंत्री जो देवाला वेळ देऊ शकत नाही तो सर्वसामान्य जनतेला काय देणार?’ अशा शब्दांत टीका केली.
हेही वाचा- वेळेच्या आधिच मुख्यमंत्री हजर : पत्रकारांना नाकारला प्रवेश…
खासदार राणेचे देवीला गार्हाणे
सध्या राज्यातील अनेक विकासात्मक कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. त्यामुळे राज्यात लोककल्याणकारी सरकार येऊ दे असे गार्हाणे श्रीदेवी भराडीला घालणार असल्याचे खासदार राणे यांनी सांगितले.
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबयाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे (आंगणेवाडी) लघुपाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे सुपूर्द केले. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे काहीही भाष्य न करता निघून गेल्या नंतर श्री राणे यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही ते म्हणाले, ‘ हा तर मुका मुख्यमंत्री जो देवाला वेळ देऊ शकत नाही तो सर्वसामान्य जनतेला काय देणार?’ अशा शब्दांत टीका केली.

News Story Feeds