महाबळेश्वर (सातारा) : आंबेनळी घाटात (Ambenali Ghat) जन्नी माता मंदिराजवळ डांबरी रस्त्याच्या कडेला नव्याने बांधण्यात आलेली पाच मीटर संरक्षक भिंत पहिल्याच पावसात (Heavy Rain) ढासळली असून या घटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Construction Department) गंभीर दखल घेतली आहे. ही भिंत बांधणाऱ्या ठेकेदारास (Contractor) बांधकाम विभागाने नोटीस (Notice) बजावली आहे. ढासळलेले काम तत्काळ काढून तेथे पुन्हा नव्याने भिंत उभारण्यात यावी, त्या शिवाय इतर कोणत्याही प्रकारची बिले अदा केली जाणार नाहीत, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. (Public Construction Department Issued Notice To The Contractor After The Protective Wall Of Ambenali Ghat Road Collapsed)

पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा महत्वाचा घाट म्हणून आंबेनळी घाटाची ओळख आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकण (Western Maharashtra and Konkan) यांना जोडणारा महत्वाचा घाट म्हणून आंबेनळी घाटाची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील फळे व भाजीपाला याच मार्गे कोकणात जातो. त्याच प्रमाणे मुंबईचे पर्यटक याच मार्गे महाबळेश्वरला येणे अधिक पसंत करतात. अशा महत्वाच्या घाटामध्ये मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. हे काम करीत असताना काही ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. जन्नीमाता मंदिरापासून जवळच एका वळणात पाच मीटर संरक्षक भिंत कोसळली आहे. ही बाब काही जागृक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांच्या कानावर घातली. त्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी तातडीने पडझड झालेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली.

Also Read: एकत्रिकरणातून काँग्रेस बाजूला आता राष्ट्रवादीकडे नजरा!

Ambenali Ghat

कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये त्यांनी पडझड झालेले बांधकाम तातडीने काढून घेण्याच्या सूचना करून त्या ठिकाणी पुरेशी खबरदारी घेवून पुन्हा नव्याने संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत. हे काम पुन्हा योग्य प्रकारे होत नाही, तो पर्यंत कोणत्याही कामाचे देयके अदा केली जाणार नाहीत, असा इशाराही नोटिसीत देण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी (Engineer Mahesh Gonjari) यांनी, कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केला असून काम चुकीचे झाले असल्याचे मान्य केले. परंतु, दोन वर्षांची देखभाल दुरूस्ती ही संबंधित ठेकेदाराकडे असल्याने त्यांनी ते पुन्हा करून देण्याची त्यांची जबाबदारी आहे. शिवाय हे काम तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहितीही गोंजारी यांनी दिली.

ज्यानं जगाला हसवलं, त्या ‘श्लितजी’ला पालकांनी घराबाहेर हाकललं

Public Construction Department Issued Notice To The Contractor After The Protective Wall Of Ambenali Ghat Road Collapsed

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here