मौलवीने धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पेशावरमधील एका कार्यक्रमात सदर मौलवी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी उकसवत आहे. आणि मलालावर हल्ला करण्यासाठी उद्युक्त करत आहे.
कराची : नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाईला (Malala Yousafzai) पाकिस्तानमधून पुन्हा एकदा धमक्या देण्यास सुरवात झाली आहे. फॅशन मॅगझिन व्होगला दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी केलेल्या विधानामुळे कट्टरपंथी लोक नाराज झाले आहेत. पाकिस्तानमधील एका मौलवीने मलालाला आत्मघातकी हल्ल्याची धमकी दिली. त्यानंतर त्या मौलवीला अटक करण्यात आली आहे, पण सोशल मीडियावर अनेक नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. (Pakistan Cleric Arrested For Threatening Nobel Laureate Malala Yousafzai)
अलीकडेच ‘व्होग’ या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीवेळी मलालाला लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तरादाखल ती म्हणाली की, “लोक लग्न का करतात, हे मला अजूनही समजत नाही. जर तुम्हाला आयुष्यात एखादी व्यक्ती हवी असेल, तर कागदावर का स्वाक्षरी करावी लागते? ती फक्त पार्टनरशिप (भागीदारी) का असू शकत नाही?” हे इस्लामविरूद्ध आहे, असे पाकिस्तानमधील नागरिकांचे म्हणणे आहे.
Also Read: ज्यानं जगाला हसवलं, त्या ‘श्लितजी’ला पालकांनी घराबाहेर हाकललं

दरम्यान, खैबरपख्तुनख्वाच्या लक्की मारवाट जिल्ह्यातील एका मौलवीने नोबेल विजेत्या मलालावर हल्ला करण्याची धमकी दिली. पाकिस्तानमधील आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या डॉनने संबंधित जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना सदर मौलवींबाबत माहिती दिल्यानंतर मौलवी मुफ्ती सरदार अली हक्कानी यांना अटक केली आहे. मौलवीविरोधी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Also Read: नायजेरियात भारतीय Koo चे जंगी स्वागत; ट्विटरचा पत्ता कट
मौलवीने धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पेशावरमधील एका कार्यक्रमात सदर मौलवी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी उकसवत आहे. आणि मलालावर हल्ला करण्यासाठी उद्युक्त करत आहे. हातात शस्त्र घेऊन तो म्हणतो की, ‘मलाला जेव्हा पाकिस्तानमध्ये येईल, तेव्हा तिच्यावर फिदायीन हल्ला करण्याचा प्रयत्न करेन.’ गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मौलवीच्या घरी छापा टाकत त्याला अटक केली.
(Edited by : Ashish N. Kadam)
This Man, pretending to be a religious scholar, is openly threatening to kill @Malala in suicide attack.
He is a habitual hate speaker but allowed to use an important platform to mislead people. He has also been involved in disinformation campaign about Covid-19 vaccines. pic.twitter.com/BSQYMDN6Za
— Naimat Khan (@NKMalazai) June 9, 2021
जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Esakal