इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जेस्म अँडरसन याने मोठा विक्रम आपल्या नावे केला. त्याने इंग्लंडचा माजी क्रिकेटर सर अॅलेस्टर कूक याचा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मागे टाकला. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामन्याचा विक्रम हा यापूर्वी सर अॅलेस्टर कूक याच्या नावे होता. त्याने इंग्लंडकडून 161 कसोटी सामने खेळले होते. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात अँडरसनने 162 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामन्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय. क्रिकेट जगतात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विश्व विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने 200 कसोटी सामने खेळले आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खास विक्रम आपल्या नावे केलेल्या अँडरसनला आता आणखी एक विक्रम खुणावत आहे. भारतीय संघाचे दिग्गज क्रिकेटर अनिल कुबंळे यांचा विक्रम मागे टाकण्याची अँडरसनला संधी आहे. यासाठी न्यूझीलंड विरुद्ध त्याला केवळ 4 विकेटची आवश्यकता आहे. क्रिकेट जगतात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या अव्वल गोलंदाजामध्ये अँडरसनचा समावेश आहे. 600 + विकेट घेणारा अँडरसन पहिला जलदगती गोलंदाज आहे.

Also Read: WTC Final : काय आहे विराट कोहली-शास्त्री गुरुजींची डोकेदुखी?
जेम्स अँडरसनने 161 कसोटी सामन्यात 26.58 च्या सरासरीने 616 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळेंनी 132 सामन्यात 619 विकेट घेतल्या आहेत. 4 विकेटसह अँडरसन अनिल कुंबळेंना मागे टाकू शकतो. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम अनिल कुंबळेंनी केला होता.
Also Read: WTC साठी न्यूझीलंडचा प्लॅन, मुंबईत जन्मलेल्या खेळाडूला संधी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन अव्वलस्थानी आहे. त्याने 133 कसोटी सामन्यात 800 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न 45 सामन्यात 708 विकेटसह दुसऱ्या तर अनिल कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेंना मागे टाकून अँडरसन तिसऱ्या स्थानावर पोहचू शकतो.
Esakal