India Tour Of Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावरील वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या दौऱ्यावर जाणार असून अपेक्षप्रमाणे अनेक नवोदित खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतूराज गायकवाडलाही श्रीलंका दौऱ्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. (Indian squad for the 3 match ODI series 3 match T20I series against Sri Lanka announced)

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे सामन्यासह तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13 जुलै पासून भारतीय संघ वनडे सामन्यासह श्रीलंका दौऱ्याला सुरुवात करणार आहे. 25 जुलैला टी-20 सामन्याने भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सांगता होईल. टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी या दौऱ्यातील प्रक्षेपणाचे अधिकार असलेल्या सोनीने भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रकाची घोषणा केली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. दुसऱ्या बाजूला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल. बीसीसीआयने अनुभवी भुवनेश्वर कुमारकडे संघाच्या उप-कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठीच्या वनडे आणि टी-20 चा संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पदिक्कल, ऋतूराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनिष पांड्ये, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (विकेट किपर), संजू सॅमसन (विकेट किपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णाप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here