रत्नागिरी – गणतीपुळे येथील शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधव का भडकले, याचे मूळ कारण पुढे आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक सिंधुदुर्गमध्ये का घेण्यात येत आहे, हा सवाल थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी केल्यावरून वादाची ठिणगी पडली. सेनेचे मंत्री आणि मोतोश्रीशी जवळीक असलेल्या लोकप्रतिनिंधीबरोबर त्यांचा वाद झाला. त्यात आढावा बैठकीच्या निमंत्रणाचाही विषय झाला. त्यावरून भास्कर जाधव प्रचंड संतापले होते. त्याचे पडसाद व्यासपीठावर उमटले.
जाधव यांच्या व्यासपीठावरील नाराजीनाट्याचा असा हा पूर्वार्ध असल्याची चर्चा आहे.
हे पण वाचा – ब्रेकिंग – मुख्यमंत्र्यांसमोरच संतापले भास्कर जाधव ; खासदारांचा झटकला हात
जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वादाला काहीशी हवा मिळत आहे. त्यामुळे धुमसत असलेले हे वाद आता पेट घेऊ लागले आहेत. यापूर्वी भास्कर जाधव यांनी जिल्हाधिकार्यांच्या झालेल्या बदलीवरून उघड-उघड आपली विरोधी प्रतिक्रिया दिली होती. राजकीय स्वार्थासाठी काहींनी ही बदली केल्याचा त्यांचा आरोप होता. त्यांचा रोख कोणाकडे होता, हे जनतेपासून लपुन राहिलेले नाही. मात्र त्याचा गणपतीपुळे येथे चांगलाच भडका झाला.
हे पण वाचा – आधीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना…अश्विनी बिद्रेंच्या लेकीचे मुख्यंत्र्यांना भावनिक पत्र
मुख्यमंत्री गणपतीपुळे विकास आराखड्याच्या कामांच्या शुभारंभासाठी आले होते. यावेळी शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार, आमदार काही पदाधिकारी मुख्यमंत्री मेळाव्याला येण्यापूर्वीच गणपतीपुळ्यात एकत्र आले होते. तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक सिंधुदुर्गात कशासाठी, असा थेट सवाल भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. त्यांच्या या प्रश्नाला मंत्री महोदय आणि मातोश्रीच्या जवळच्या नेत्याने तत्काळ उत्तर दिले की, आता हा विषय कशाला, त्याचे पूर्ण नियोजन झाले आहे. आयत्यावेळेला तो बदलता येणार नाही. तेव्हा भास्कर जाधव यांनीही मी तुम्हाला विचारले नाही. साहेबांशी बोलतो आहे, असे उत्तर दिल्याने हा वाद वाढत गेला. अखेर सिंधुदुर्गातच बैठक होणार, असे सांगितल्यामुळे भास्कर जाधव यांचा पारा चढला. परस्पर होणार्या निर्णयांची त्यांच्या मनात चीड होतीच. त्यात ही भर पडल्याने ते अधिक संतापले. त्याचे सर्व पडसाद व्यासपीठावर उमटले. त्यात राजशिष्टाचार देखील पाळला नाही याची भर पडली.

News Story Feeds