सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या टप्‍प्यात बाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. दुसऱ्या लाटेतील आपत्तीचा सामना करताना ग्रामीण स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४६४ ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) कोरोनाला हद्दपार केले आहे. याच गावांचा आदर्श घेत इतर बाधित गावांनी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. (Corona Outbreak Decreased In 464 Villages In Satara District)

राज्यभरात कोरोना नियंत्रणात येत असताना जिल्हा रेड झोनमध्ये गेला होता. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत होती.

राज्यभरात कोरोना नियंत्रणात येत असताना जिल्हा रेड झोनमध्ये (Red Zone) गेला होता. यावेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत होती. तसेच, कोरोनाच्या दुसरा टप्‍प्यात कमी वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याने परिस्थिती गंभीर होत होती. गेले १५ दिवस कोरोनाचा संसर्ग वाढतानाच दिसत होता. त्यामुळे कडक लॉकडाउन (Strict lockdown) करण्यात आला. त्यानंतर गेल्या २ दिवसांपासून संसर्ग कमी होत आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासनाने गावनिहाय उपाययोजना राबविण्यास सुरवात केली. प्रत्येक गावात ग्रामदक्षता समितीच्या माध्यमातून जनजागृती करणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड, बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन चाचण्या करणे, ग्रामस्तरावर इतर आजार असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविणे, गावातील आपत्तीजनक परिस्थितीवर दैनंदिन लक्ष देऊन त्यावर नियंत्रण ठेवणे.

Also Read: साताऱ्यात रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनशिवाय रुग्णांना बरं करणारा ‘देवमाणूस’

तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करून घेणे, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणे, संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांची काळजी घेणे आदी कामे दक्षता समितीमार्फत करण्यास सुरवात केली. याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामावर लक्ष दिले जात होते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार विविध प्रकारच्या उपाययोजनांमुळे बहुतांश गावे कोरोनामुक्त झाली आहेत. दरम्यान, विविध उपाययोजना राबवत जिल्ह्यातील ४६४ ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणू गावापासून हद्दपार करण्यात यश मिळविले आहे.

Also Read: कोरोना तपासणी नाकारल्यास कारवाई करा; गृहराज्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सक्त आदेश

CORONA

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बहुतांश गावांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी चांगले काम केले आहे. याच प्रकारे इतर गावांनी काम करून प्रशासनाला सहकार्य करावे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासही सुरवात केली आहे.

-विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा

Also Read: कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवणं ही जिल्हावासियांची जबाबदारी : शेखर सिंह

कोरोनामुक्त झालेली तालुकानिहाय गावे…

 • सातारा- 51

 • कोरेगाव- 30

 • खटाव- 31

 • माण- 12

 • फलटण- 6

 • खंडाळा- 11

 • वाई- 26

 • जावळी- 58

 • महाबळेश्‍वर- 52

 • कऱ्हाड- 43

 • पाटण- 144

 • एकूण 464

Corona Outbreak Decreased In 464 Villages In Satara District

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here