• मुंबईत सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी

मुंबई: एक दिवस सुटी घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा मुंबईत हजेरी लावली. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पावसाने आपला जोर दाखवून दिला. मुंबई (Mumbai), उपनगरे (Suburban), ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai), पनवेल (Panvel) या विभागांमध्ये पहाटेपासून पावसाने जोरदार (Heavy Rainfall) हजेरी लावली. दादर, चेंबूर अंधेरी, सायन, किंग्ज सर्कल या ठिकाणी सखल भागात लगेचच पाणी साठले आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे दिसले. टाळता येणारच नसेल तरच घराबाहेर पडा असा इशारा हवामान विभागाने आणि महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. (Mumbai Rain Update Heavy Rainfall Alert IMD these 18 days in 4 Months of Monsoon are dangerous for Mumbaikars)

Also Read: मुंबईत पाऊस is Back!! लोकल सेवा सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली

पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबई महापालिकेनं केलेले नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसानं फोल ठरवले. अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. यानंतर आता हवामान विभागानं पुढील धोक्याची सूचना दिली आहे. पावसाळ्याच्या ४ महिन्यांत १८ दिवस धोक्याचे असतील, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या १८ दिवसांत अरबी समुद्राला भरती येईल. त्यामुळे ५ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. याच कालावधीत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागेल.

Also Read: मुंबई : दहिसरमध्ये तीन घरं कोसळली; एकाचा मृत्यू

23 जून- 10.53 – 4.56

24 जून- 11.45 -4.77

25 जून- 12.33 – 4.85

26 जून- 13.23 – 4.85

27 जून- 14.10 – 4.76

28 जून- 14.57 – 4.61

23 जुलै – 11.37- 4.59

24 जुलै- 12.24 -4.71

25 जुलै- 13.07 4.73

26 जुलै- 13.48 – 4.68

27 जुलै- 14.27 – 4.55

10 ऑगस्ट- 13.22 – 4.50

11 ऑगस्ट- 13.56 – 4.51

22 ऑगस्ट- 12.07- 4.57

23 ऑगस्ट- 12.43- 4.61

24 ऑगस्ट- 13.17 – 4.56

8 सप्टेंबर- 12.48 – 4.56

9 सप्टेंबर- 13.21 – 4.54

(संपादन- विराज भागवत)Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here