नवेखेड : एसटी च्या इतिहासाची माहिती नव्या पिढीला माहिती व्हावी, आत्मीयता वाढावी या उद्देशाने गतकाळातील विविध प्रकारच्या बसची माहिती देणारा ‘वाहन नामा’ हा उपक्रम एसटीने सुरू केला आहे. याला प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धीही देण्यात आली आहे. विविध टप्प्यावर बदलेला एसटीचा लूक लोकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

१९४८ ते २०२१ या ७३ वर्षांमध्ये एसटीने बदललेली रूपे याचा वेध घेण्यात आला आहे. एक जून १९४८ ला पहिली बस कशी होती. पहिली आराम बस कोणत्या मार्गावर धावली, वातानुकूलित बस कोठे बांधण्यात आली याची इत्थंभूत माहिती या ‘वाहन नामा’ मध्ये देण्यात आली आहे. १ जून १९४८ ला तिच्या निळ्या चंदेरी रंगाची तीस आसनी बस नगर पुणे मार्गावर पहिल्यांदा धावली. भाडे होते अवघे ५० पैसे. पहिल्यांदा एसटीच्या कार्यशाळेत लेलँड कंपनीचा चासिसवर बस बांधणी करण्यात आली. मुंबईच्या सांताक्रूझ येथील कार्यशाळेत बस बांधण्यात आली.

Also Read: नातेवाइकांच्या आक्रोशाने डोळे पाणावले; 2 बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पहिली आरामबस १९५० ला वापरात आली. दोन बाय दोन आसने असणारी ही बस लोकप्रिय ठरली. १९५३ ला पहिल्यांदा मालवाहतूक बस धावली. भूकंप महापूर या आपत्ती काळात एसटीने मोठे योगदान दिले. १९६० ला पहिली लाल पिवळी बस पुढे आली. यावेळी गंज रोधक अॅल्युमनिअम पत्राच्या वापर करण्यात आला. हा रंग सर्वत्र लोकप्रिय ठरला. 1962 ला भारत, चीन व 1965 ला भारत, पाकिस्तान या युद्धकाळात एकूण ८० बसेस तयार करुण संरक्षण खात्याकडे देण्यात आल्या.

१९६४ -६५ ला आराम बस वातानुकूलित बस बांधण्यात आल्या. पुढे हिरकणी, यशवंती, शिवनेरी, परिवर्तन, विठाई, शिवशाही आशाही बसेस तयार करण्यात आल्या व त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. पुढे प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या एसटी प्रत्येक महिन्याला वेगळा विषय घेऊन सोशल मीडिया व इतर माध्यमाद्वारे प्रवाशांशी संवाद साधणारा आहे. एसटीमध्ये झालेला सकारात्मक बदल त्याला सचित्र रुप देऊन तो मांडण्यात येणार आहे एसटीच्या या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा आहे .

Also Read: सुखद धक्का! अखेर 20 वर्षांनी झाली मायलेकरांची भेट

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here