शिरवळ (जि. सातारा) : गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले शिरवळ (shirwal) शहर आता प्रांताधिकाऱ्यांनी सूक्ष्म प्रतिबंधक म्हणून घोषित केल्याने येथील नागरिक व व्यापारींना काहीसा दिलासा मिळाला आहे. (shirwal-micro-containment-zone-satara-marathi-news)
कडक लॉकडाउन (lockdown) असल्याने येथील व्यापारी (businessman) मेटाकुटीस आले होते. नागरिकांनाही नागरी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. या वेळी शिरवळ हे प्रतिबंध क्षेत्र (containment zone) न करता सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (micro conatinment zone) घोषित करण्यात यावे, अशी विनंती स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी तहसीलदारांमार्फत प्रांताधिकाऱ्यांना करण्यात आली होती.
Also Read: सातारा : ‘या’ तालुक्यात फक्त मेडिकल व दवाखाने सुरू राहतील
त्यानुसार शहरामध्ये सध्या कोरोनाची स्थिती व लसीकरणाचा आढावा घेऊन संपूर्ण शहर प्रतिबंधक न करता या शहरातील एकूण १२२ क्षेत्रांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या सर्व क्षेत्रांच्या सीमा पुढील आदेशापर्यंत सीलबंद करण्यात आल्या असून, या प्रत्येक क्षेत्रातील सर्व दुकाने, व्यवसाय पूर्णपणे बंद राहतील. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून दूध, भाजीपाला, किराणामाल, औषधे, खते, बी-बियाणे इत्यादी सेवा घरपोच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत. दुकानदारांना लसीकरण करणे बंधनकारक असणार आहे असे प्रांताधिकारी संगिता राजापुरकर- चौगुले यांनी आदेशात म्हटले आहे.

दरम्यान पुणे- सातारा महामार्गावरील पंढरपूर फाटा (शिरवळ) येथे एका हॉटेलमध्ये मेडिकल साहित्याचा एकूण ५७ लाख ९४ हजार ६०० रुपयांचा विनापरवाना साहित्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आला. या धडाकेबाज कारवाईची परिसरात मोठी चर्चा झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील एका हॉटेलात मेडिकलसाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शन सिरीज व आयव्ही सेट आदी साहित्य विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना साठवणूक ठेवलेला माल आढळून आला. पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश इंगळे पोलीस उपनिरीक्षक, वैशाली देसाई, सागर अरगडे यांनी ही माेहिम राबवली. प्राथमिक तपासात साठवणुकीसाठी घरात जागा उपलब्ध होत नसल्याने या हॉटेलात साठा केल्याचे संशयिताकडून सांगण्यात येत आहे.
Also Read: आमदारांना टेंपोत बसवून फेऱ्या मारा! नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मात्र,त्यासाठी परवाना घेण्यात आला नसल्याने हा विनापरवाना साठा असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी दिवसभर पंचनामा करून एकूण ५७ लाख ९४ हजार ६०० रुपयांचे मेडिकल साहित्य जप्त करण्यात आले. यासंदर्भात संशयितांवर कारवाई सुरू असल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे अधिकारी अरुण गोडसे यांनी दिली. तपासात सहकार्य न केल्यास संशयितावर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. या मेडिकल साहित्य एक्सपायरीची तारीख २०२२ अशी आहे.
Esakal