आशिया खंडात संदुर आणि स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेले फार कमी देश आहेत. काही दिवसांपूर्वी स्वच्छ समुद्रकिनाऱ्या टॅग देखील देण्यात आला. त्यामध्येही भारतातील समुद्रकिनाऱ्यांचा समावेश होता. मग चला तर पाहुयात असे समुद्रकिनारे-

हा शिवराज्यपूर समुद्रकिनारा असून गुजरातमधील जामनगर येथे आहे. याठिकाणी फिरायला गेल्यास प्रताप विलास पॅलेस आणि मरीन राष्ट्रीय उद्यान देखील पाहू शकता.
हा गोल्डन बीच असून ओडिसामधील सर्वाधिक सुंदर समुद्रकिनारा आहे. बंगालच्या खाडीवर हा बीच असून लोकप्रिय देखील आहे.
कासरकोड समुद्रकिनारा असून दक्षिणेतील कर्नाटक राज्यामध्ये आहे. कुटुंब, मित्र तसेच जोडीदारासोबत फिरायला जायचं असेल तर हे एक उत्तम डेस्टीनेशन आहे.
घोघ्ला समुद्रकिनारा असून दमन आणि दीवमधील सर्वाधिक सुंदर समुद्रकिनाऱ्यापैकी एक आहे. याला हनिमून डेस्टीनेशन म्हणून देखील ओळखले जाते.
रुशिकोंडा समुद्रकिनारा असून आंध्रप्रदेशात आहे. आंध्र प्रदेशात जायचा प्लॅन असेल तर नक्की या समुद्रकिनाऱ्याला भेट द्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here