सातारा : सातारा – पुणे रस्त्याची (satara pune road) काय अवस्था आहे हे तुम्हांलाही माहित आहे. त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी मी पाठपूरावा करीत आहे. आज एनएचएआयचे (NHAI) अधिकारी यांच्यासमवेत माझा दाैरा आहे. माझ्या नियाेजीत कामांमुळे मी त्यांना आज तरी भेटू शकत नाही. परंतु ते माझे बंधू आहेत कधीही घरी येऊ शकतात असे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या भेटीविषयी माध्यमांशी जलमंदिर पॅलेस येथे बाेलताना स्पष्ट केले. आमच्या भेटीबाबत उलट सुलट चर्चा सुरु असल्याचे तुमच्या माध्यमातून मला समजत आहे तरी काेणीही चुकीचा अर्थ काढू नका असे आवाहनही उदयनराजेंनी केले आहे. (maratha-reservation-udayanraje-bhosale-sambhajiraje-chhatrapati-meeting-postponed-satara-trending-news)

मराठा आरक्षणावरुन (maratha reservation) संभाजीराजे छत्रपती आणि तुमच्यांत वैचारिक मतभेद आहेत. संभाजीराजे सर्वांना भेटताहेत, प्रश्नावर चर्चा करताहेत परंतु तुम्हांला अद्याप भेटलेले नाहीत असा प्रश्न शिवराज्यभिषेक दिनी (shivrajyabhishek din) उदयनराजेंना माध्यमांनी केला हाेता. त्यावेळी उदयनराजेंनी ते माझे धाकटे बंधू आहेत. आमच्यांत काेणतेही मतभेद नाही असे स्पष्ट केले हाेते.

Also Read: ..तर देशाचे तुकडे हाेण्यास वेळ लागणार नाही

गुरुवारी संभाजीराजे छत्रपती यांनी काेल्हापूरात 16 जूनला मोर्चा नाही तर मूक आंदोलन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद केले. याबराेबरच सकल मराठा समाजाच्या बैठकीत संभाजीराजे छत्रपतींनी उदयनराजेंची भेट घेणार आहे असेही सांगितल्याची चर्चा हाेती. त्यावेळेपासून संभाजीराजे छत्रपती खासदार उदयनराजेंना कधी भेटणार याची उत्सुकता सर्वांना लागली हाेती. ही भेट आज (शुक्रवार) पुण्यात हाेईल अशी चर्चा साता-यात सुरु झाली हाेती. दाेन्ही राजेंची भेट पुण्यात हाेईल असा अंदाज समर्थकांकडून गुरुवारी रात्रीपासून बांधला जात हाेता. दाेन्ही राजेंच्या भेटीपुर्वीचा दाेघांचा एक व्हिडिआे देखील समाज माध्यमातून व्हायरल करण्यात आला हाेता.

Also Read: देशातील ‘या’ उद्यानांत पहा रंगी-बिरंगी फुलपाखरु

मराठा आरक्षण

दरम्यान आज आपल्याला एनएचएआयच्या अधिका-यांसमवेत सातारा पुणे रस्त्याबाबतच्या दुरुस्तीसाठी चर्चा करायची हाेती. त्याबाबत माझा दाैरा देखील आहे. माझा पुर्वनियाेजीत दाैरा असल्याने मी त्यांना आज भेटू शकणार नाही. ते माझे बंधू आहेत. मला भेटण्यासाठी ते कधीही घरी येऊ शकतात. त्यांच्या प्रत्येक गाेष्टीत मी त्यांच्यासमवेत आहे असा विश्वासही उदयनराजेंनी संभाजीराजे छत्रपतींच्या भेटीविषयी माध्यमांकडे व्यक्त केला. मी सर्वांना एकच सांगू इच्छिताे कोणीही याचा चुकीचा अर्थ काढू नका. आमची भेट होईल, विविध विषयांवर आम्ही चर्चा करणारच आहोत असेही उदयनराजेंनी नमूद केले. मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा आंदाेलन वगैरे करणे ही फालतूगिरी आहे. खरं तर लाेकांनी आमदार खासदारांना जाब विचारला पाहिजे असेही राजेंनी नमूद केले.

ब्लाॅग वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here