पावसाळ्याच्या दिवसात मेथीची भाजी आणि त्यापासून तयार होणारे अनेक पदार्थ सर्वांनाच आवडतात. मेथीची भाजी, मेथी पराठे असे अनेक पदार्थांना पसंती दिली जाते. या दिवसात आलू मेथीची भाजीही अनेकजण चवीने खातात. पण तुम्हाला माहिती आहे का? की या मेथीच्या पानांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ याचा रोजच्या आहारात याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

लहानांसाठी पोषणाचा उत्तम स्त्रोत म्हणून ब्रेस्टमिल्ककडे पाहिले जाते. हे लहान मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडते. ज्या स्त्रियांना याच्या काही अडचणी असल्यास त्यांनी आहारात मेथीचा वापर करु शकता. त्यामुळे ब्रेस्टमिल्कची समस्या दूर होऊ शकते. मेथीची पाने शरीरातील ब्रेस्टमिल्कचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात.

मेथीची पाने ही लिवरमधील कोलेस्ट्रॉल अवशोषण करुन त्याचे शरीरातील उत्पादन वाढवण्याचे काम करते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात या पानांचा वापर केल्यास शरीरासाठी फायद्याचे ठरते. तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही कमी करण्यास मदत होते.

मेथीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने हृदय तंदुरुस्त आणि स्वस्थ राहते. यामुळे शरीरालाही फायदा होतो. शिवाय हृदयाशी काही संबंधित आजारांना दुर करण्याचे कामही मेथीची पाने करतात. हृदयाच्या बाबतीत मेथीची पाने ही एका जडीबुटी सारखी काम करतात.

हीमोग्लोबीन हा शरीराचा एक महत्वाचा घटक आहे. जो लालपेशींमध्ये असतो. तुमच्या शरीरात जर हिमोग्लोबीनची कमतरता असेल तर तुम्ही आहारात मेथीच्या पानांचा वापर करु शकता. याच्या सेवनाने तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात लोह मिळेल.

मेथी आणि तिचे अॅंटीऑक्सिडंटचे गुण पचन यंत्रणा सुलभ करतात. पचनप्रक्रिया सुधारण्यासाठी याचा वापर होतो. पचन संबंधित कोणत्याही समस्येला दुर ठेवण्यास या पानांची मदत होते. पोटाचे काही विकारही यामुळे कमी होण्यास मदत होते.

Esakal