लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान अमिताभ आणि रेखा यांच्यातील मैत्रीचे किस्से संपूर्ण देशाभरातील गल्ली-बोळात पोहोचले होते.

‘मिस्टर नटवरलाल’ (Mr. Natwarlal) चित्रपटाच्या निर्मात्यांना असा फायदा झाला, की आनंद बक्शी (Anand Bakshi) संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल (Laxmikant Pyarelal) यांच्यासमवेत त्यांच्या ‘राम बलराम’ चित्रपटाची गाणी लिहित होते आणि याच वेळी कुठूनतरी संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची येथे एन्ट्री झाली. राजेश रोशन (Rajesh Roshan) यांनी बक्शी यांना चित्रपटाकरिता गाणी लिहिण्यासाठी विनंती केली. यावेळी बक्शींनी नाही होय करत, रोशन यांची विनंती मान्य केली व गाण्यासाठी तयार झाले. दरम्यान, बक्शी साब हे गाणं एक-एक करत देत राहतील आणि मेकर्स क्रमवारीत रेकॉर्ड करत राहतील, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बक्शी म्हणाले, जर आपण काम लवकर आटोपलं, तर बाकीचे निर्माते माझ्यावर नाराज होतील आणि ते म्हणतील, बक्शी यांनी रोशन यांनाच सगळं काही दिलंय का? त्यामुळे त्यांनी थोडा धीर धरायला सांगितला. आणि अशा तऱ्हेनं नाही होय म्हणत, रागाच्या भरात बाहेर पडलेली, ही गोष्ट या चित्रपटातील सर्वाधिक हिट गाणी देणारी ठरली. ‘परदेसिया ये सच है पिया, सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया।‘ या गाण्याचे बोल तयार झाले आणि बक्शी बलकनीत बाहेर गेले. तद्नंतर ते परत आले आणि गाण्याच्या अंतरा त्यांनी अवघ्या 15 मिनिटांत लिहून हे गाणं पूर्ण केलं, तेही म्युझिकसह..
लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान अमिताभ आणि रेखा यांच्यातील मैत्रीचे किस्से संपूर्ण देशाभरातील गल्ली-बोळात पोहोचले होते. यापूर्वी दोघांनीही एकत्र काम केले होतं. मात्र, आताची चर्चा थोडी निराळीच होती. त्यानंतर या दोघांची जोडी ‘राम बलराम’मध्ये पुन्हा एकत्र झळकली. पण, काश्मिरातील या किस्स्यामुळे अमिताभच्या घरात वादंग निर्माण झाला आणि अमिताभला पुन्हा रेखासोबत कोणताही चित्रपट साइन न करण्याची बंदी घालण्यात आली. मात्र, हे निर्बंध फारकाळ टिकले नाहीत.
यश चोप्रांसाठी अमिताभवरील निर्बंध मागे घेत, ‘सिलसिला’ या चित्रपटाचं कास्टिंग अमिताभसोबत केलं गेलं. अमिताभ बच्चन एक चांगला कलाकार आहे, हे बक्शींना चांगलीच माहित होतं. त्यामुळे त्यांनी खास या चित्रपटात अमिताभसाठी एक गाणं तयार केलं. चित्रपटाचं पहिलं गाणं ‘परदेसिया’ लिहिल्यानंतर लगेचच बक्शींनी चित्रपटाचे संगीतकार आणि दिग्दर्शकाला समजावून सांगितलं की, ‘कभी कभी’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ज्या प्रकारे साहिरच्या ओळी वाचल्या आहेत, ते गाणंही खूप चांगल्या प्रकारे गाऊ शकतात. राजेश रोशन यांनी ही ‘बात’ मनावर घेत स्वत: च्या दिग्दर्शनाखाली अमिताभ बच्चन यांना गाणं गायला लावलं आणि हेच गाणं सर्वाधिक सुपरहिट ठरलं.
लता मंगेशकर यांच्यासह किशोर कुमार, अमिताभ बच्चन, आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनीही ‘मिस्टर नटवरलाल’ चित्रपटात गाणी गायली. अनुराधा पौडवाल यांनी मोहम्मद रफींसमवेत या चित्रपटाचं एक गाणंही गायलंय. चित्रपटाच्या गाण्यातील संगीतानं चित्रपटाला हिट बनविण्यात खूप मदत केली. गाणी तयार होईपर्यंत ज्ञानदेव अग्निहोत्रीनं चित्रपटाची कहाणीच फोडून टाकली होती. त्यामुळे राकेश कुमार यांनी नवी कथा, पटकथा स्वत: लिहिली. आणि कादर खान यांनी दोन आठवड्यांतच चित्रपटाचे सर्व संवाद पूर्ण केले. पुढील दोन महिन्यांत चित्रपटासाठी संपूर्ण युनिट काश्मीरला गेले आणि चित्रपटाचे प्रदीर्घ वेळापत्रक पूर्ण करून मुंबईला परतले.
मुंबईतील वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये चित्रपटाचे उर्वरित शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण चित्रपट तयार झाला. जेव्हा हा चित्रपट सेन्सरवर जाणार होता, तेव्हा चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटिस मिळाली. ही नोटीस बिहारच्या नटवरलाल यांच्या वतीनं होती. ज्यांना सर्व फसवणुकीच्या घटनांचा सामना करावा लागला होता. म्हणून, त्यांच्या परवानगीशिवाय ‘नटवरलाल’ चित्रपटाचे नाव ठेवू शकले नाहीत. चित्रपटाचे नाव पूर्वी फक्त ‘नटवरलाल’ असे होते. त्यानंतर त्यात ‘मिस्टर’ जोडले गेले. वास्तविक, जर नटवरलाल यांनी यावरही आक्षेप घेतल्यास, या चित्रपटाचं नाव ’अमिताभ बच्चन इन एंड एज मि. नटवर लाल’. अशी ठेवण्याचीही तयारी दर्शविली होती.
1979 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी कमाईच्या बाबतीत ‘मिस्टर नटवरलाल’ चौथ्या क्रमांकावर होता. या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा तोच चित्रपट होता. अमिताभ बच्चन, शशी कपूर यांचा मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सुहाग’ हा चित्रपट आणि दिग्दर्शक राज कुमार कोहलीचा चित्रपट ‘जानी दुश्मन’ दुसर्‍या क्रमांकावर, तर ऋषि कपूर यांचा के विश्वनाथ दिग्दर्शित ‘सरगम’ चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर होता.
कमाईच्या बाबतीत, याचवर्षी रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या इतर चित्रपटांमध्ये ‘काला पत्थर’ पाचव्या क्रमांकावर आणि ‘द ग्रेट गॅम्बलर’ आठव्या क्रमांकावर होता. ‘द ग्रेट गॅम्बलर’ ही अमिताभच्या कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा ​​होती. कारण, हा चित्रपट बाॅक्सऑफिसवर जास्त काळ चालला नव्हता आणि त्याच दरम्यान मिथुन चक्रवर्ती याच्या रुपानं ‘सुरक्षा’ या चित्रपटाच्या निमित्तानं एक नवा सुपरस्टार बाॅलिवूडला मिळाला होता.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here