मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) परिसरात तीन दिवसापूर्वीच शेतकऱ्यांना (Farmer) दर्शन देणाऱ्या बिबट्याने (Leopards) दोन दिवसात बकरीसह वासरूचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला (Forest Department) दिल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी (Forest staff) घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

(leopards again attacke farmers panic among)

Also Read: पहिले लग्‍न लपवत केला दुसरा विवाह; दुसऱ्या पत्‍नीचाही सुरू केला छळ

तीन दिवसापूर्वी वरखेडे येथील पिनल पवार व विक्रम कच्छवा वाहनातून मेहूणबारेकडून वरखेडेकडे येत असतांना जयसिंग कच्छवा यांच्या शेताजवळ बिबट्या रस्ता ओलांडतांना दिसला होता. नंतर दोन दिवसातच वरखेडे येथील झिरो वायरमन श्री. राठोड यांनाही रात्रीच्या वेळेस बिबट्या दिसला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

बिबट्याचे दर्शन झाल्याने

शेतकऱ्यांसह शेतमजूर भयभीत झाले असतांना आज शुक्रवार (ता.11) रोजी पहाटे वरखेडे येथील शेतकरी दीपक पवार हे वरखेडे मेहूणबारे रस्त्यावरील माळरानावर असलेल्या शेतात सकाळी दुध काढण्यासाठी गेले आसता शेतातील जाळीत बांधलेली बकरीचा बिबट्याने फडशा पाडलेले दिसून आले. विशेष म्हणजे जाळीत उडी टाकून बिबट्याने बकरी फस्त केली. दोन दिवसापूर्वीही बिबट्याने त्यांचेच वासरू फस्त केले होते. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यावर प्रकाश देवरे व श्रीराम राजपूत यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

Leopards

पिंजरा लावण्याची मागणी

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतीशिवार फुलुन गेला असतांना पुन्हा या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने आणि बिबट्याने वासरूसह शेळी फस्त केल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.त्यामुळे या भागात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Also Read: प्लॅटफॉर्म तिकीट ५० ऐवजी आता दहा रुपयांत

मोकाट कुत्र्यांची संख्या कमी

दरम्यान वरखेडे गाव परिसरात रान डुकरांची संख्या कमी झाली असतांना आता मोकाट भटकणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. बिबट्यानेच या कुत्र्यांचा फडशा पाडला असावा अशी चर्चा आहे. जनावरांवर हल्ला करणाऱ्या बिबट्या मानवांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here