जळगाव : किमान आधारभूत किंमतीत भरडधान्य (Grain) खरेदी योजनेंतर्गत केन्द्र शासनाकडून (Central government) जिल्ह्याला 25,500क्विंटल ज्वारी, 2,240 क्विंटल गहू खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हयात 17 केन्द्रांवर 17 हजार 329 (Grain shopping center) शेतकर्‍यांनी 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी केली. या शेतकर्‍यांकडील भरड धान्याची खरेदी 8 जून तर मका उत्पादनाची खरेदी आजपासून सुरु झाली असून 30 जूनपर्यत खरेदी केली जाईल. यामुळे जिल्ह्यात उशीरा का होईना हमीदर योजनेंतर्गत ज्वारी,गव्हासाठी नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना (Farmer) दिलासा मिळाला आहे.
(jalgaon district seventeen grain shopping center start)

Also Read: वरखेड्यात ‘त्या’ बिबट्याकडून हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीती !

गेल्या काही वर्षांपासून हवामान आणि पीक पध्दतीतील बदलांमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मका, ज्वारी, बाजरीचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्ह्यात ज्वारी मका, गहू उत्पादनासाठी आधारभूत किंमतीत धान्य खरेदीसाठी 10 एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी करायची होती. त्यानुसार ज्वारीसाठी 10,679, मका 6574 तर गव्हासाठी 76 शेतकर्‍यांकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यात सर्वात जास्त नोंदणी पारोळा केंन्द्रावर मका 854 तर ज्वारीसाठी 2171 शेतकर्‍यांनी नोंदणी केली. सर्वात कमी 76 शेतकर्‍यांची तर जळगाव तालुका खरेदी-विक्री संघ आणि चाळीसगाव शेतकरी सहकारी संघ येथे प्रत्येकी 1 शेतकरी अशी नोंदणी झाली. भुसावळ, कोरपावली, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर आणि अमळनेर येथे एकाही शेतकर्‍याची नोंद नाही.

grain

धान्याच्या आवकवर परिणाम
स्थानिक बाजार समित्यांमध्ये संसर्ग प्रादूर्भाव काळात काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते. तर काही ठिकाणी धान्याच्या आवकवर परिणाम झाल्याचे दिसले. दुसरीकडे मे महिना संपुष्टात येउनसुद्धा भरडधान्य खरेदी सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल मिळेल त्या किमतीला स्थानिक कृषी उत्पन्न बाजारात किंवा व्यापार्‍यांकडे विक्री केला आहे.

Also Read: पंतप्रधान व मुख्‍यमंत्री भेटीचे राजकारण नको : संजय राऊत

शासनस्तरावरून ज्वारी, गहू आणि मका उत्पादनासाठी 30 एप्रिलपर्यंत 17,329 शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली. यात ज्वारीसाठी 2,620 तर गहू 1,975 आणि मका 1,850 असे हमीदर आहे. खरेदी 30 जून पर्यंत केली जाणार आहे. मोबाईलवर मेसेज मिळाल्यानुसार शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल नोंदणी केलेल्या केंन्द्रावर आणावा.
-गजानन मगरे. जिल्हा विपणन अधिकारी. जळगाव.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here