कऱ्हाड (सातारा) : औद्योगिक परिसरासह तेथे काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तासवडेसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीत अग्निशामक केंद्र (Fire station) सुरू करा, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी एमआयडीसीच्या (MIDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या. कऱ्हाड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Karad Industries Manufacturers Association), एमआयडीसी, वीज वितरण कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (National Highways Authority) अधिकारी यांची संयुक्त बैठक तासवडे येथील एमआयडीसीमध्ये पार पडली. त्या वेळी त्यांनी सूचना केल्या. (MP Shrinivas Patil Instructs officers To Start Fire Station in Satara MIDC)

कामगार राज्य विमा महामंडळामार्फत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक बोलविली होती. बैठकीस मुंबई, पुणे, कोल्हापूर व तासवडे एमआयडीसींचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे अधिकारी (Power Distribution Company), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते. खासदार पाटील म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रमाणे जिल्ह्यात तशी दुर्घटना होऊ नये. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात यावीत. कऱ्हाड येथे व जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीमध्ये जेथे अग्निशमन केंद्रे नाहीत. तेथे अग्निशमन केंद्रे सुरू करावीत. ही कार्यवाही उद्योजकांना विश्वासात घेऊन करावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे डेप्युटी चीफ अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले (Officer Milind Ogale) यांना केली.

Also Read: ‘मायक्रो फायनान्स’नं वसुली थांबवावी, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन

MP Shrinivas Patil

कामगार राज्य विमा महामंडळामार्फत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. उद्योगांना विजेचा तुटवडा भासत असून, त्यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित झाला, तर उद्योजकांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी एमआयडीसीने वीजपुरवठा करणारी यंत्रणा, खराब झालेल्या तारा दुरुस्त करून घ्याव्यात, तसेच स्थानिक मागणीनुसार वीज वितरण कंपनीमार्फत येथे ११० केव्हीचे सब स्टेशन होणे गरजेचे आहे. तासवडे येथे एमआयडीसीची स्थापन झाल्यापासून तेथे अग्निशमन केंद्र नाही. त्याची जागा राखीव ठेवली असतानाही अग्निशमन केंद्र नाही. आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास उद्योजकांना आर्थिक नुकसान तर सहन करावे लागतेच मात्र शिवाय जीवितहानीचा मोठा धोका संभवतो.‘‘ असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, अभय नांगरे, सागर जोशी व संजय पिसाळ यांनी या वेळी समस्या उपस्थित केल्या.

MP Shrinivas Patil Instructs officers To Start Fire Station in Satara MIDC

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here