नागठाणे (सातारा) : गर्द काळोखात लुकलुकणारा एखादा काजवा पाहिला तरी मन हरखून जाते. मग एखाद्या झाडावर (Tree) एकाच वेळी चमचमणारे हजारो काजवे (Fireflies) पाहण्याचा आनंद किती अवर्णनीय असेल, याची केवळ कल्पनाच केलेली बरी. कास परिसरातील (Kas Pathar) काजव्यांची हीच अद्भुत दुनिया निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. (Fireflies Are Seen In Large Numbers In The Western Part Of Satara)
काजवा हा तसा सर्वांच्याच परिचित असणारा कीटक. तो अधूनमधून वा सलगपणे प्रकाश देतो. कोलिऑप्टेरा गणाच्या भुंग्याच्या कुलात त्याचा समावेश होतो.
काजवा हा तसा सर्वांच्याच परिचित असणारा कीटक. तो अधूनमधून वा सलगपणे प्रकाश देतो. कोलिऑप्टेरा गणाच्या भुंग्याच्या कुलात त्याचा समावेश होतो. तो निशाचर भुंगा आहे. त्याच्या अंदाजे दोन हजार जाती आढळतात. दिवसा ते लपून बसतात. रात्र झाली की बाहेर पडतात. काजव्यांचा प्रकाश पांढरा, पिवळा, नारिंगी, हिरवा, निळा वा तांबडा असतो. तो पाहणाऱ्याचे मन उल्हसित करतो. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या कास परिसरात मोठ्या संख्येने काजवे दृष्टीस पडत असल्याची माहिती निसर्ग अभ्यासक धनंजय अवसरे (Dhananjay Avsare) यांनी ‘ई सकाळ’शी बोलताना दिली.
Also Read: पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात, मग पायी वारी का नको?; अक्षयमहाराजांचं टीकास्त्र

काजवे हे साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाहावयास मिळतात. जून महिन्याच्या आठ ते दहा तारखेपर्यंत त्यांचे दर्शन घडते. ग्रीष्म ऋतू संपून वर्षा ऋतूचे आगमन होईपर्यंत काजव्यांचा हंगाम असतो. हे काजवे रात्रीच्या वेळी रानावनांत वा जंगलातली मोठ्या झाडांवर पाहावयास मिळत असल्याचे श्री. अवसरे यांनी सांगितले. ते पाहताना आकाशातील तारांगण झाडावर अवतरल्यासारखे भासते. काजव्यांची लुकलुक ही लयबद्ध असते. काही काजवे सतत लुकलुकतात, तर काही काजवे अधूनमधून एकदम चमकतात. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास काजव्यांची चमक टिपेला पोचते.
Also Read: पुण्यात केमिकल कंपनीला आग; एमआयडीसीत अग्निशामक केंद्र सुरू करा : खासदार पाटील
काजव्यांचा अधिवास…
साताऱ्याच्या पश्चिमेस असलेल्या यवतेश्वर रस्त्याच्या आजूबाजूला काजवे मोठ्या प्रमाणात आढळतात. तिथून पुढे काही अंतरावर देवकल, पारांबे इथेही काजव्यांची वस्तीस्थळे आहेत. कास रस्त्यावरून घाटाई मंदिराकडे जाणाऱ्या चोरटाका परिसरातही काजवे दिसतात. कासाणी गावच्या भोवताली असलेल्या वृक्षराजीतही काजवे आढळतात.
Fireflies Are Seen In Large Numbers In The Western Part Of Satara
Esakal