ओरोस – पुन्हा निवडणुका घेवून दाखवा, असे खुले आव्हान भाजपने दिले आहे. त्यामुळे त्यांना आता समजले आहे की आघाडी सरकार कोसळू शकत नाही. असा टोमना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते सिंधुदुर्गनगरी येथील महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
हे पण वाचा – …म्हणून चढला भास्कर जाधवांचा पारा
मुख्यमंत्री ठाकरे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेतला. यानंतर सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषि भवन येथे त्यांचा आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत आमदार वैभव नाईक आमदार दीपक केसरकर यांच्यासह राष्टवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, गौरीशंकर खोत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, प्रवीण भोसले, व्हिक्टर डांटस, संदेश पारकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हे पण वाचा – आधीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना…अश्विनी बिद्रेंच्या लेकीचे मुख्यंत्र्यांना भावनिक पत्र
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले , शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस एकत्र येण्याचा उत्सव मोठा आहे. यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. कशामुळे ते आता बोलणार नाही. वेळ आली की निच्छित सांगेन. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकजुटिने एकत्र आले यात आनंद आहे. एकजुटिने काम केल्यास पक्ष मोठे होतात. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने भाजपला ते पचनी पडलेले नाही. भाजप आमच्या सरकारवर सारखी टीका करत हे सरकार लवकरच कोसळणार, असे जनतेला भासवत आहे. कालतर एका ठिकाणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका घेवून दाखवा? असे खुले आव्हान दिले आहे. यावरून आमचे सरकार टिकणार असल्याचे भाजपने अप्रत्येक्ष मान्य केल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीला कधीही तडा जाणार नाही.
आढावा बैठकीत मुख्यंत्र्यांनी प्रत्येक मतदार संघातील प्रश्न समजावून घेतले. शेतकरी, उद्योग धंदे, घर बांधणी या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले. ही जिल्ह्याचा आढावा घेण्याची आपली नवीन पद्धत असून याच माध्यमातून विकासाचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विषयावर बोलताना ट्रामा केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय कॉलेज उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

News Story Feeds