सोलापूर : नैसर्गिक संकटातूनही वाट काढणारा बळीराजा कोरोनाच्या (Coronavirus) दोन्ही लाटेतील कडक निर्बंधांमुळे (Lockdown) अधिकच अडचणीत आला. जानेवारी 2020 ते मे 2021 या काळात राज्यातील तीन हजार 385 शेतकऱ्यांनी (Famer) जगाचा निरोप घेतला असून त्यातील केवळ साडेबाराशे कुटुंबियांनाच शासनाकडून (Maharashtra Government) अर्थसहाय मिळाले आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद मदत व पुनर्वसन विभागाकडे झाली आहे. (3385 Farmers Commit Suicide In Maharashtra State During The Year Solapur Marathi News)

नैसर्गिक संकटातूनही वाट काढणारा बळीराजा कोरोनाच्या दोन्ही लाटेतील कडक निर्बंधांमुळे अधिकच अडचणीत आला आहे.

अवकाळी (Cyclone Tauktae), अतिवृष्टीचा फटका (Heavy Rain), कर्जमाफीची प्रतीक्षा, खासगी सावकारीसाठी तगादा, बॅंकांकडून कर्ज मिळेना, सरकारी मदत नाही, हमीभावाचीही प्रतीक्षा, अशा नैसर्गिक व मानवनिर्मित संकटात आता कोरोनाची भर पडली. लॉकडाउनमधील निर्बंधामुळे बाजारपेठा बंद, शेतमालाची मागणी घटली, उत्पन्नाचा खर्चही निघाला नाही, घरातील सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, वयात आलेल्या मुलीच्या विवाहाची चिंता, मुलाच्या हाताला काम नाही, या वैफल्यातून जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाने गळफास जवळ केला. जानेवारी ते डिसेंबर 2020 या काळात दोन हजार 547 शेतकऱ्यांनी तर जानेवारी ते मे 2021 या काळात 850 शेतकऱ्यांनी त्यांची जीवनयात्रा संपविली. तत्पूर्वी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दोन्ही लाटेत राज्यभर लॉकडाउन केला.

Also Read: Solapur University : 60 हजार विद्यार्थी देणार ऑनलाइन परीक्षा

या कठीण काळात शेतकरी वगळता अन्य घटकांना मदत मिळाली. मात्र, निर्बंधांमुळे गावोगावचे बाजार बंद, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांची घटलेली संख्या, शेतमालाला मागणी नसल्याने दर पडले आणि उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होऊ लागला. त्यातही सरकारकडून मदत नाही, डोक्‍यावरील कर्ज वाढले, घरातील मुला-मुलींची चिंता, यातून बहुतेक शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे निरीक्षण मदत व पुनर्वसन विभागाने नोंदविले आहे. दरम्यान, अशा प्रसंगात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उणे प्राधिकरणाद्वारे अर्थसहाय दिले जाते. परंतु, त्यावरही निर्बंध असल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदतीसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे खावे लागत आहेत.

Also Read: उदयनराजेंकडून व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल

Famer

ठळक बाबी…

  • मागील 15 महिन्यांत राज्यातील तीन हजार 397 कुटुंबातून हरपला जगाचा पोशिंदा

  • कोकण विभागात कोरोना काळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही

  • राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या; 16 महिन्यांत केवळ साडेबाराशे कुटुंबियांनाच मदत

  • अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 683 शेतकऱ्यांची आत्महत्या

  • सोलापूर जिल्ह्यातील 16 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांपैकी दोघांनाच मिळाली शासनाची मदत

  • आर्थिक परिस्थिती बिघडल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडील उणे प्राधिकरणातून मिळत नाही अर्थसहाय

Also Read: पुण्यात केमिकल कंपनीला आग; एमआयडीसीत अग्निशामक केंद्र सुरू करा : खासदार पाटील

विभागनिहाय आत्महत्या (जानेवारी 2020 ते मे 2021)

  • नाशिक : 467

  • पुणे : 31

  • औरंगाबाद : 1061

  • अमरावती : 1459

  • नागपूर : 367

  • एकूण : 3,385

3385 Farmers Commit Suicide In Maharashtra State During The Year Solapur Marathi News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here