सोलापूर : शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील विद्यार्थ्यांची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे द्वितीय सत्र परीक्षा घेता आली नाही. आता कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी झाला असून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) संलग्नित 101 महाविद्यालयांमधील सर्वच अभ्यासक्रमाच्या जवळपास 60 हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा (Online Exam) 1 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Sixty Thousand Students Of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Will Appear For The Online Exam)
कोरोनाचे संकट अजूनही दूर झाले नसून आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यापीठाने आगामी सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्चित केले आहे.
कोरोनाचे संकट अजूनही दूर झाले नसून आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत विद्यापीठाने आगामी सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्चित केले. परीक्षा मंडळानेही त्यास मान्यता दिली. दरम्यान, या परीक्षेसाठी देखील “प्रॉक्टिरिंग’ (विद्यार्थ्यांच्या हालचालीचा वेध घेणारे तंत्र) या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. जेणेकरून हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही आणि विद्यार्थ्यांना एकमेकांना विचारून उत्तरे सोडविता येणार नाहीत, असा त्यामागचा हेतू आहे. संबंधित परीक्षार्थींचा आयपी-ऍड्रेस ट्रेस करून त्याठिकाणी एकटाच विद्यार्थी परीक्षा देतोय का, तो इतरत्र हालचाल करून उत्तरे लिहतोय का, तो कोणाशी फोनवरून बोलतोय का, याची पडताळणी या तंत्रातून केली जाते. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा पध्दतीत पारदर्शकता आल्याचेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Also Read: उदयनराजेंकडून व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल
नव्या सत्राची सप्टेंबरपासून सुरवात
कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट, या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्षाची सुरवात, परीक्षा, निकाल, अशा बाबींवर परिणाम झाला. तरीही, या संकटातून बाहेर निघत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आगामी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन बहुतेक विद्यापीठांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यानंतर आठवडाभरात निकाल जाहीर केला जाणार आहे. तर 1 सप्टेंबरपासून नव्या सत्राला सुरवात होईल, असेही परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. कदम यांनी सांगितले.
Also Read: पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात, मग पायी वारी का नको?; अक्षयमहाराजांचं टीकास्त्र

राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावरच घेतल्या. परंतु, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने आपल्या स्तरावर नियोजनबध्द परीक्षा घेतल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेत निकालही वेळेत जाहीर केले.
-डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग
Sixty Thousand Students Of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University Will Appear For The Online Exam
Esakal