सोनई(अहमदनगर) ः माका (ता.नेवासे) येथील लोकनियुक्त सरपंचावर गावातील चौदापैकी एकरा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला. तो काही तासात मंजूर होणारच होता. परंतु कौटुंबिक बंदकी बाजूला ठेवून पुतण्याचा गट ऐनवेळी मदतीला आला. आणि सरपंच हटवण्याचा ठराव बारगळला गेला. भावकीमुळेच गावकी करता आली.

राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असलेल्या माका ग्रामपंचायतीची सन २०१९ मध्ये निवडणूक झाली होती. विद्यमान सरपंच नाथा घुले व त्यांचे पुतणे अनिल घुले सरपंच पदाचे उमेदवार होते. चुलता-पुतण्यातील ही लढत चुलत्याने जिंकली होती.(Natha Ghule will be the Sarpanch of Maka village)

Also Read: महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील रिझर्व्हेशन सीट होणार कमी

या लढतीनंतर दोन घुले परीवारात भाऊबंदकी अधिकच वाढली होती. तीन वर्षांनंतर चुलत्यावर आलेले अविश्वासाचे संकट पुतण्याच्या सहा सदस्यांमुळे टळले आहे.

अनेक गावातील ग्रामपंचायतीचे राजकारण भाऊबंदकीमुळे टोकाला जाते. कौटुंबिक वाद गावाच्या विकास कामात अडवा येतो. अनेक गावात भाऊबंदकीमुळे वाद, मारामा-या आणि जिरवाजिरवी होत असताना माका येथे चुलता-पुतण्याने राग, द्वेष बाजूला ठेवत मनोमीलन केले. यामुळे अविश्वास ठरावाच्या पडताळणी बैठकीत आठ सदस्य गैरहजर राहिल्याने सरपंच घुलेंनी बाजी मारली.

पुतणे अनिल घुले यांच्यामुळे चुलत्यांचे सरपंचपद अबाधित राहिले.

अविश्वास ठरावाच्या निमित्ताने काय घडलं, काय बिघडलं हे विसरून संपूर्ण गावाच्या विकासासाठी यापुढे काम केले जाईल. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे गावात संघटन अबाधित रहावे याकरीता अग्रक्रम राहील.

– नाथा घुले, सरपंच माका.

यशस्वी होण्यासाठी कौटुंबिक घडी जुळलेली पाहिजे. ही जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची शिकवण

डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला. कुटुंब व गावाचे हित लक्षात घेवून मनाचा मोठेपणा घेतला. यातून कुठलाही अर्थ काढू नये.

– अनिल घुले, युवक कार्यकर्ते, माका.

(Natha Ghule will be the Sarpanch of Maka village)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here