कोल्हापूर: महापुराच्या (Flood management) कालावधीतही शहराचा संपर्क तुटू नये, यासाठी शहराच्या प्रवेशद्वारापासूनच उड्डाणपूल करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन आहे. २०१९च्या महापुरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारही पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे कोल्हापुरात महापूर असला तरीही शिये फाट्यावरून (राज्य मार्ग १९४) थेट ताराराणी पुतळा किंवा शहाजी कॉलेजपर्यंत(Tararani statue Shahaji College) येता येईल, असा उड्डाणपूल नियोजित आहे. सध्या त्याची थ्रीडी इमेज तयार झाली असून, ‘टोपोग्राफिक’ सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ट्रॅफिक आणि इतर सर्वेक्षण लवकरच अपेक्षित आहे. (kolhapur-flood-management-preparati-on-entry-by-flyover-marathi-news)
सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून हे शक्य आहे. त्यामुळेच कोल्हापूर उड्डाणपुलाने जोडण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यापैकी कोल्हापूर ते शिये या मार्गावरील थ्रीडी इमेजिस सध्या तयार झाल्या आहेत. नुकताच महामार्ग, सार्वजनिक बांधकाम आणि इतर विभागांची बैठक पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांनी घेतली. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होत आहे. त्या अनुषंगाने या उडाणपुलाचेही नियोजनातील संदर्भ पुढे आले आहेत. शिये फाटा- राष्ट्रीय महामार्ग-तावडे हॉटेल- ताराराणी पुतळा हे अंतर साधारण ११.३० किलोमीटर आहे. हेच शिये ते ताराराणी चौक उड्डाणपूल झाला तर त्याचे अंतर साधारण ९.९० किलोमीटर असेल. यामुळे तावडे हॉटेलपासून कोल्हापुरात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.

असे आहे नियोजन
दुहेरी मार्ग उड्डाणपूल असेल
अंदाजित एकूण १० किलोमीटर
शिये ते ताराराणी चौक किंवा ९.९० किलोमीटर
शिये ते शहाजी कॉलेज १०.०० किलोमीटर
पंचगंगा नदीवर सध्या असलेल्या पुलावर आणखी १ पूल
पुलाची रुंदी ८.५० मीटर
महापालिका हद्दीत ७.४५ किलोमीटर
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २.५५ किलोमीटर
महापुरात कोल्हापूर शहराचा संपर्क तुटला तरीही उड्डाण पुलाच्या माध्यमातून शहरात मदतकार्य सुरू ठेवता येणार आहे. २०१९ च्या महापुरात राष्ट्रीय महामार्गावर आणि कसबा बावडा येथील मार्गावरही पाणी आल्यामुळे मदतकार्य पोचण्यास समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याला पर्याय म्हणून ही संकल्पना पुढे आली असून, त्याचे नियोजन सुरू आहे.
– संभाजीराव माने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
Esakal