आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी 46 वर्षाची आहे. तिचा फिटनेस पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. शिल्पा अनेक शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसते. ती योगा आणि वर्क आऊट नियमित करते. तसेच शिल्पा तिच्या आहाराची देखील विशेष काळजी घेते.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. मलायकाचे वय 47 वर्षे असून ती नियमित व्यायाम करते. योगा आणि वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ मलायका नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. मलायकाला 18 वर्षाचा अरहान नावाचा मुलगा आहे. तिच्या फिटनेसमुळे ती वयाने अजूनही तरूण वाटते.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या सौदर्याने आणि अभिनयाने विशेष स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस येतात. ऐश्वर्या यांचे वय 51 वर्ष आहे तरी देखील एखाद्या तरूण अभिनेत्रीइतक्याच त्या फिट दिसतात.
फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी मंदिरा बेदी 49 वर्षाची आहे. मंदिरा रोज ट्युमरल व्यायाम आणि योगा करते. सोशल मीडियावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात.
चित्रपटांमधील आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. नीना या 62 वर्षाच्या आहेत. तरी देखील त्या फिट दिसतात. नेहमी आनंदी आणि फ्रेश मूडमध्ये असणाऱ्या नीना सध्या तरूण मुलींच्या आदर्श ठरत आहेत.
पूजा बेदी ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे वय सध्या 51 वर्ष असून ती तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेत असते. पूजा सामाजिक विषयांवरील तिचे मत सोशल मीडियावर मांडत असते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here