मेढा (सातारा) : जावली तालुक्यात सुसज्ज तालुका स्तरीय क्रीडा संकुल (Sports Complex) होणार असून सुमारे पाच कोटीच्या या संकुलासाठी सध्या एक कोटी रूपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक (Sports Officer Yuvraj Naik) यांनी दिली. या तालुका स्तरीय क्रीडा संकुलासाठी मेढा व बिभवी या दोन गावाच्या परिसरात नुकतीच जागेची पाहणी करण्यात आली. (There Will Be Sports Complex In Jawali Taluka Satara Sports News)

या क्रीडा संकुलनामुळे जावली तालुक्याच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

या प्रसंगी जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका क्रीडा अधिकारी श्री. कोळी, क्रीडा कमिटीचे राजेंद्र जाधव , क्रीडा शिक्षक समीर आगलावे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख उपस्थित होते. तालुका क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे या संकुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. तसेच राजेंद्र जाधव हेही यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. या संकुलामध्ये धावण्याचा ट्रॅक, विविध खेळाची मैदाने, बहुउद्देशीय हॉल, पंचवीस लाखाची खेळाचे विविध साहित्य व क्रीडा संकुलास संपूर्ण संरक्षण भिंत अशा प्रकारे सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. जागेची निश्चिती होताच लगेच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.

Also Read: ‘जातीभेदाचं राजकारण करणाऱ्या आमदार-खासदारांना जाब विचारा’

Sports Complex

खेळासाठी जावली तालुक्याचे वातावरण पोषक असून तालुका, जिल्हा, राज्य व देशपातळीवर खेळाडू निश्चितच चमकावेत, त्यांना सर्व खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हाच यामागचा शासनाचा उद्देश असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी सांगितले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या कमिटीचे अध्यक्ष असून, तहसीलदार राजेंद्र पोळ कार्याध्यक्ष, जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, गटशिक्षणाधिकारी जावली हे सदस्य असून तालुका क्रीडा अधिकारी हे सचिव आहेत. या क्रीडा संकुलनामुळे जावली तालुक्याच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

There Will Be Sports Complex In Jawali Taluka Satara Sports News

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here