जळगाव ः शहरातील कोल्हे हिल्स जवळ कुंभारखोरी पार्क (Kumbharkhori Park) आहे. येथे १५ हेक्टर जागेत अनेक प्रकारच्या वनस्पती, झाडे, आयुर्वेदीक झाडे लावली आहे. त्यासोबतच तेथे आता २ किलोमिटर अंतराएवढा मॉनिंग ट्रॅक (Morning track) तयार करण्यात आला आहे. ते काम नूकतेच पूर्ण झाले असून ते मॉर्निग वॉक करणाऱ्यासाठी खुला करण्यात आला आहे. या पार्कममध्ये लुप्त झालेल्या महाकाय ‘डायनोसोर’ची (Dinosaurs) प्रतिकृती बसविण्यात आली आहे. (dinosaur statue at kumbharkhori park in jalgaon)

Dinosaurs

कुंभारखोरी वन उद्यानाचे काम मागील वर्षी कोविडमुळे संथ गतीने सुरू होते. एकूण १५ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर गेल्या २ वर्षात वृक्ष लागवड सुरू करण्यात आली आहे. यावर्षी देखील १५०० रोपे लावण्यात येणार आहेत. जलसंधारणसाठी २ तलावाचे काम पूर्ण झाले आहे.
जिल्हा नियोजन समितीतून यासाठी निधी मिळाला आहे. मॉर्निक वॉक ट्रक सोबतच कारंजेही उभारण्यात येत आहे.

मोफत मॉनिंग वॉक

सकाळी मॉनिंग वॉकला येणाऱ्यांना मोफत या ट्रॅकवर वॉक करू दिले जात आहे. येथे उद्यान व्यवस्थापनासाठी समिती कार्यान्वित करण्यात येत आहे. उद्यानात येणाऱ्यांना दहा रूपये, विद्यार्थ्यांना पाच रूपये शुल्क तर मासीक पाससाठी दोनशे रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

Morning track

कोविड अनलॉक नंतर निसर्ग सहवासात जॉगिंग करणाऱ्यासाठी लांडोरखोली पार्क पर्वणी ठरू शकेल. लवकरच तेथे आणखी दोन डायनासोरच्या प्रतिकृती बसविल्या जातील. कारंजेही सुरू केले जातील. यंदा १५०० वृक्ष येथे लावले जाणार आहे.
डॉ.सैफुन शेख, विभागीय वनअधिकारी, जळगाव.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here