French Open 2021 Womens Final : फ्रेंच ओपन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेसिकोवा हिने रशियाच्या अ‍ॅनास्तासिया पॅवलिउंचेंकोवाला पराभूत करत कारकिर्दीतील पहिले वहिले ग्रँडस्लॅम पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी चेक प्रजासत्ताकची ती दुसरी खेळाडू ठरलीये. तिने अंतिम सामन्यात 6-1, 2-6, 6-4 अशा फरकाने अ‍ॅनास्तासिया पॅवलिउंचेंकोवाला पराभूत केले. 40 वर्षानंतर फ्रेंच ओपनमध्ये चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूने मैदान मारले. या सामन्यातील विजयासह तिने नवा इतिहासच रचला आहे. (French Open 2021 Womens Final Krejcikova beats Pavlyuchenkova to win first Grand Slam title at Roland Garros)

रशियन टेनिस स्टार अ‍ॅनास्तासिया पॅवलिउंचेंकोवाला

10 वर्षांत 52 प्रयत्नानंतर फायनलमध्ये पोहचलेल्या रशियन अ‍ॅनास्तासिया पॅवलिउंचेंकोवाने पहिलाच सेट 1-6 असा गमावला. त्यानंतर तिने झोकात कमबॅक केले. दुसऱ्या सेटमध्ये 6-2 अशी बाजी मारत सामन्यात रंगत निर्माण केली. तिसऱ्या सेटमध्येही तिने चांगली फाईट दिली. पण हा सेट 6-4 असा जिंकत बार्बरा क्रेसिकोवाने पहिल्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरले. बार्बराने सेमीफायनलमध्ये 3 तास 18 मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत टेनिस जगतातील 17 व्या मानांकित सक्कारियाचा अडथळा पार करुन फायनल गाठली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here