पुणे – इंधनाच्या (Fuel) वाढत्या दरामुळे (Rate) डिझेलवर (Diesel) होणाऱ्या खर्चात बचत करण्यासह पर्यावरणाचे नुकसान (Environment Loss) टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) (PMP) २३३ डिझेल बसचे ‘सीएनजी’मध्ये (CNG) रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पीएमपीचा डिझेलवर होणारा वार्षिक ११ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च 9Expenditure) वाचणार आहे. (PMP will Save 11 Crore a Year)
प्राथमिक तत्त्वावर ५ बसचे रूपांतर करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिबस सुमारे पाच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर ११ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी पीएमपीने महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. पीएमपीकडून ५२२ जुन्या डिझेल बसचे रूपांतर सीएनजी तथा एलएनजीमध्ये करण्याचे नियोजित आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २३३ डिझेल बसचे रूपांतर करण्यासाठी सुमारे ११ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोरोनामुळे पीएमपीला गेल्या काही महिन्यात मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच डिझेल बसच्या देखभाल, दुरुस्तीसह इंधनावरील खर्च लाखोंच्या घरात आहे. त्या तुलनेत सीएनजी बसचा खर्च कमी आहे. डिझेलच्या दरात सध्या सातत्याने वाढ होत असून, प्रदूषणात देखील भर पडत आहे. यामुळे डिझेल बसचे ‘सीएनजी’मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

उद्यापासून ६५० बस मार्गांवर धावणार
पुणे – कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मार्गावरील बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून (ता. १४) ताफ्यातील चाळीस टक्के म्हणजेच ६५० बस मार्गावर सोडण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक निर्बंध देखील कमी केले आहेत. शहरातील सर्व दुकाने सध्या सुरू झाली आहेत. तेथे काम करणारे अनेक कर्मचारी पीएमपीने प्रवास करतात. मात्र, केवळ २५ टक्केच बस मार्गावर असल्याने या सर्वांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता पीएमपीने मार्गावरील गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून दोन्ही शहरांत १३ आगारांतून २५५ बसमार्गांवर ६५५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
Also Read: म्युकरमायकोसीसवर पुणे जिल्ह्यातील २४२ रुग्णांची मात
प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक असून, विनामास्क बसमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. या बसमधून निम्म्या प्रवासी क्षमतेने वाहतूक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२३३ बसचा प्रतिवर्ष खर्च (रुपयांत)
-
३१ कोटी ५८ लाख – डिझेल
-
२० कोटी २३ लाख – सीएनजी
डिझेल बसचे सीएनजीत रूपांतर केल्यानंतर प्रदूषण टाळण्यास मदत होईल. बसच्या इंजिनाचे आयुर्मान दहा वर्षांहून अधिक वाढणार आहे. याशिवाय बसच्या खर्चात घट होऊन बचत होणार आहे.
– डॉ. राजेंद्र जगताप, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Esakal