‘वेध भविष्याचा’ आणि ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतील प्रसिद्ध ज्योतिषी भगरे गुरुजी यांची मुलगी अनघा सध्या तिच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत आहे. अनघा ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमध्ये ‘श्वेता’ या खलनायिकेची भूमिका साकारते. अनघानं महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे.तसेच ‘अनन्या’या नाटकामध्ये अनघानं अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती.अनघा फिटनेसला खूप महत्व देते. तसेच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.