कऱ्हाड (जि. सातारा) : सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रेठरे बुद्रुकसह कऱ्हाडमध्येही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याबाबत चर्चा केली. रेठऱ्यात डॉ. इंद्रजित मोहितेंसह रयत पॅनेलच्या संभाव्य उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. कऱ्हाडमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरेंसह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. मंत्री कदम यांनी दिवसभरात केलेल्या खलबतांमुळे पुन्हा एकदा कृष्णा कारखान्यात अविनाश व डॉ. इंद्रजित मोहिते गटाच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगली आहे. (krishna-sugar-factory-election-vishwajeet-kadam-meeting-in-karad-satara-marathi-news)

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटात एकत्रीकरण होईल, अशी शक्यता धूसर झाली असतानाच राज्यमंत्री कदम यांनी शनिवारी दिवसभर कऱ्हाडला घेतलेल्या बैठकांमुळे पुन्हा एकदा ती चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर मंत्री कदम यांच्याकडून होणारी खलबते महत्त्वाची ठरली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री कदम यांनी कऱ्हाड तालुक्यात दिवसभर ठाण मांडले होते. डॉ. मोहिते यांच्या रेठऱ्यातील निवासस्थानी सकाळी दहाच्या सुमारास मंत्री कदम यांनी भेट दिली.

Also Read: काळजी करु नका! मी तुमच्या पाठीशी आहे : उदयनराजे

पहिल्यांदा डॉ. मोहिते व मंत्री कदम यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर निवडक कार्यकर्त्यांसह रयत पॅनेलच्या संभाव्य उमेदवारांशी त्यांनी संवाद साधला. इंद्रजित मोहिते यांच्यासोबत असल्याचे मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘कृष्णा कारखाना निवडणुकीत अविनाश मोहिते यांच्याशी एकत्रीकरणासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात फारसे यश आलेले नाही. या निवडणुकीत मी डॉ. मोहिते यांच्यासोबत ताकदीने आहे. त्यासाठी अपेक्षित जुळवाजुळवही करण्याची तयारी आहे. पृथ्वीराज चव्हाण या भागाचे आमदार आहेत. त्यांनाही सोबत घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्याचाही विचार करून योग्य पावले टाकावी लागणार आहेत.’’

Also Read: एकत्रिकरणातून काँग्रेस बाजूला आता राष्ट्रवादीकडे नजरा!

रेठऱ्यातून मंत्री कदम यांनी थेट कऱ्हाड गाठले. हॉटेलमध्ये त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी मनोहर शिंदे, शिवराज मोरे, नानासाहेब पाटील, नरेंद्र पाटील, नितीन थोरात यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यातही दोन्ही मोहित्यांमध्ये एकत्रीकरण कसे करता येईल, यासह काँग्रेसची रणनीती काय असली पाहिजे, काय करता येऊ शकते. यासह एकत्रीकरणावरही सकारात्मकता दिसली. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही मोहित्यांची चर्चा रंगली आहे. मंत्री कदम यांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचीही भेट घेतली. त्यांच्या सोबतही त्यांनी ‘कृष्णा’सह विविध विषयांवर चर्चा केली. कृष्णा कारखान्यातील रणनीती काय असावी, काँग्रेसची भूमिका काय ठेवता येईल, याविषयी दोघांत झालेली चर्चाही महत्त्वाची ठरली.

Vishwajeet-Kadam

दोन दिवसांत निर्णय शक्य

ज्येष्ठ नेते शरद पवार व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीनंतर कृष्णा कारखान्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेससोबत राष्ट्रवादीही आता चर्चेत येऊ लागली आहे. विचारांवर आधारित आघाडीच्या स्थापना करण्यासाठी दोन्ही पक्षांतील बहुतांशी नेते सकारात्मक आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काही सुखद बातम्या वाचा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here