बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानीचा आज 29 वा वाढदिवस.दिशा तिच्या सौदर्याने प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकत असते. दिशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. 2015 मध्ये ‘लोफर’ या चित्रपटामधून दिशाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये दिशाने काम केले या चित्रपटामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.एका मुलाखतीमध्ये दिशाने सांगितले होते की, अभिनय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तिने शिक्षण आर्धवट सोडले. दिशा मुंबईमध्ये फक्त 500 रूपये घेऊन आली होती. दिशाने मुलाखतीमध्ये सांगितले, ‘मी एकटी राहून काम करत होते. पण मी कधीच घरच्यांना मदत मागितली नाही.’2017 साली दिशाने मुंबईमधील वांद्रे येथे फ्लॅट खरेदी केला. त्या फ्लॅटची किंमत ५ कोटी रुपये आहे. दिशाच्या घराचं नाव ‘लिटिल हट’ असं आहे.लवकरच दिशा ‘व्हिलन-२’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.