मुंबई – आपल्या सामाजिक उपक्रमामुळे अभिनेता सोनु सूद (actor sonu sood) ओळखला जातो. समाजात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला धावून जाणे, त्यांना मदतीचा हात देणे यासाठी सोनू नेहमीच चर्चेत असतो. कोरोनाच्या काळात त्यानं हजारो जणांना मदत (thousand of help) केली आहे. त्याच्या मदतशील स्वभावामुळे अनेकांना फाय़दा झालेला आहे. आतापर्यत सोनूनं मुलांच्या शिक्षणासाठी, रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. तो पुन्हा त्याच्या मदतशील स्वभावामुळे चर्चेत आला आहे. (sonu sood offers free coaching scholarships for upsc aspirants know detail)
युपीएससी (upsc) करणा-या विद्यार्थ्यांना त्यानं मदत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षेची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी फ्री कोचिंग (free coching) करण्यासाठी त्यानं पुढाकार घेतला आहे. यापूर्वी देखील सोनूनं अनाथ मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सहकार्य करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सोनूचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याला त्यांनी मोठ्या प्रमाणात धन्यवाद दिले आहेत.

गेल्या वर्षांपासून कोरोनानं देशापुढे एक मोठे संकट उभे केले आहे. त्यात सोनुनं गरिब लोक, विद्यार्थी यांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या वेळी ज्यांनी नोकरी गमावली आहे अशा अनेक व्यक्तींना त्यानं मदतीचा हात दिला आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सोनुनं यापुढील काळात स्पर्धा परिक्षा करणा-या विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानं त्यासंबंधी एक पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) केली आहे.
Also Read: ‘महिला प्रधान चित्रपटांमध्ये सेलिब्रेटी अभिनेत्यांना रस नसतो’
अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न असते. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्यानं त्यांना त्यासाठी आवश्यक ते क्लासेस जॉईन करता येत नाहीत. सध्या कोरोनामुळे आर्थिक प्रश्न पालकांसमोर तयार झाले आहेत. त्यासाठी सोनुनं पुढाकार घेतला आहे. सोनुनं सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली आहे. युपीएससीच्या विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग देण्यासाठी स्कॉलरशिप देण्याची घोषणा केली आहे.
Esakal