मांगूर : राधानगरी तालुक्यातील (radhanagari) सरवडे गावातील ईश्वरा कोळी यांनी अनिल रामचंद्र टोपे, सुनील रामचंद्र टोपे या दोन जावयांना ( son-in-law) प्रेमापोटी तब्बल 54 किलो 810 ग्रॅम वजनाचा फणस शनिवारी (१२) भेट दिला. सध्या मांगूरसह परिसरात याची चर्चा सुरू आहे. जावयांनीही फणसाच्या बियांपासून रोप लागवड करून पर्यावरण समतोल राखण्यास हातभार लावण्याचा संकल्प केला आहे.
आजपर्यंत आपण फणस खूप मोठा असतो, हे ऐकत होतो. पण प्रत्यक्षात 55 किलो वजनाचाही फणस (jackfruit) असतो, हे पाहण्यास मिळाले. राधानगरी तालुक्यातील सरवडे गावातील ईश्वरा कोळी या सासर्यांनी कोरोना काळात जावई व मुलींना आपण काय द्यायचे या विचारातून तब्बल 55 किलो वजनाचा फणस भेट दिला आहे. त्याची चर्चा गावात रंगली आहे. मांगूरच्या या जावयांनी सुद्धा सासऱ्याने दिलेल्या प्रेमापोटीच्या फणसातील गोड गर खाऊन न थांबता त्यांनी पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या दृष्टीकोनातून एक संकल्प हाती घेतला आहे.
Also Read: आम्हीच तुमची वाट पाहतोय; संभाजीराजेंचे नक्षलवाद्यांना पत्र

या फणसातील हजार ते बाराशे बियांपासून फणसाची रोप लागवड करून त्यातील एक रोप प्रत्येकाला भेट म्हणून देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचेही सर्वत्र स्वागत होत आहे. या फणसाचे वजन 54 किलो 810 ग्रॅम असून त्याची उंची 3 फूट लांब तर घेर 4 फूट इतका आहे. हा फणस सहजासहजी एका माणसाला उचलत नाही.
“माझी व भावाची सासरवाडी कोकण भागातील सरवडे आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी सासरवाडीकडून आम्हाला फणस खायला मिळतात. पण यंदा इतका मोठा फणस पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. आम्ही या फणसातील बियांपासून रोप लागवडीचा संकल्प हाती घेऊन त्यातील एक रोप प्रत्येकाला देण्याचा संकल्प केला आहे.”
– अनिल रामचंद्र टोपे, जावई, मांगूर
Also Read: तरुणाई व्हाइटनरच्या नशेच्या विळख्यात…!
Esakal