लांबसडक काळेभोर केस असावेत अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. मात्र, वातावरणातील बदल, चुकीची आहारपद्धती यामुळे अनेक जणी केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. अनेकदा महागडे कॉस्मॅटिक्स किंवा ट्रिटमेंट केल्यानंतरही केसांची ही समस्या दूर होत नाही. म्हणूनच आयुर्वेदात अशा काही वनस्पती आहे, ज्यामुळे केसांची समस्या समूळ नष्ट होऊ शकते.
जास्वंद –
अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, डोक्यात चाई पडणे यावर जास्वंद तेल अत्यंत गुणकारी आहे. आजकाल बाजारातही हे तेल मिळतं. मात्र, घरी केल्यास ते जास्त फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेलात ४-५ जास्वंदाची फूलं घालून हे तेल चांगलं उकळून घ्यावं व गार झाल्यावर बाटलीत भरावं. हे तेल आठवड्यातून ३ वेळा किंवा दररोज लावलं तरीदेखील चालतं.
मेथी दाणे –
भारतीय स्वयंपाक घरात आवर्जुन वापराले जाणारे मेथी दाणे केसांसाठीही तितकेच फायद्याचे आहेत. मेथीमुळे केस गळती थांबते तसंच केसांची वाढ होते.
कोरफड –
कोरफड अत्यंत बहुगुणी असून अनेक त्वचाविकार व केशविकारांमध्ये तिचा वापर होतो. कोरफडमुळे डोळ्यात कोंडा होणे, टाळू सतत तेलकट राहणे या समस्या दूर होतात.
माका –
केसांच्या वाढीसाठी माका – भृंगराज अत्यंत फायदेशीर आहेत. माक्यामुळे केसांची वाढ होण्यासोबत अकाली पांढऱ्या होणाऱ्या केसांच्या समस्येपासूनही सुटका मिळते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here